एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अभिनेत्री जान्हवी कपूर चा हटके जिम लूक! तिच्या या लूकवरून नजर हटणार नाही…

बॉलिवूड अभिनेत्री जेवढी मेहनत सुंदर दिसण्यासाठी करतात, तेवढीच मेहनत त्या सुडौल आणि फिट राहण्यासाठी देखील करताना दिसतात. त्यामुळे आपल्या डाएट बरोबरच जिम च्या नित्यनेमाने वाऱ्या करणं हे देखील या अभिनेत्री आपल्या बिझी शेड्युल मधून सांभाळताना दिसतात.

यामध्ये श्रीदेवीची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर देखील मागे नाही बरं का! ती देखील नियमित जिम ला जाते. सध्या तिचा हाच जिम लूक लोकांना जाम आवडला आहे.

आपला जिम लूक अपडेट ठेवण्यात अभिनेत्री मलायका अरोरा चा हात कोणीही धरू शकत नाही. तिच्या हटके जिम आऊटफिट चे लोक दिवाने आहेत. त्यामुळे मलायकाला लोक जिम लूक मधली स्टाईल आयकॉन मानतात. मात्र सध्या जान्हवी कपूरचा जिम लूक मलायकाच्या या स्टायलिश लूक ला टक्कर देताना दिसत आहे. जान्हवीचे जिम लूक मधले फोटो सध्या सोशल मीडिया वर धुमाकूळ घालत आहेत.

चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी जान्हवी खूपच गुबगुबीत होती. तिच्या पदार्पणाच्या वेळचे फोटो बघितल्यास हे लक्षात येईल. त्यावेळी देखील ती तितकीशी स्लीम नव्हती. मात्र त्यानंतर बरीच मेहनत करून तिने आपला आताचा स्लीम लूक मिळवला आहे. तिच्या या स्लीम आणि जिम लूक मधले फोटो सध्या सोशल मीडिया वर बरेच व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये ती कधी स्टायलिश टॉप आणि फुल लेगिंग्ज मध्ये बघायला मिळते, तर कधी ती टॉप आणि शॉर्ट्स मध्ये आपली स्लीम फिगर दाखवताना दिसते.

आऊटफिट कोणताही असो, जान्हवी या जिम लूक मध्ये खूपच सुंदर आणि हॉ’ट दिसते आहे. अर्थातच तिच्या चाहत्यांना तिच्यावरून नजर हटवणं मुश्किल झालं आहे. आपल्याला जसं रोजच्या जीवनाच्या स्पर्धेला तोंड द्यावं लागतं, तसंच या अभिनेत्रींना देखील अनेक स्पर्धांचा सामना करावा लागतो.

फिट राहणं हा त्याचाच एक भाग आहे. जान्हवी चे जिम लूक ‘हम भी किसीसे कम नहीं’ असंच दाखवत आहेत. तिचा हा नवीन स्लीम लूक आपल्याला लवकरच एखाद्या नवीन चित्रपटात बघायला मिळू दे.

काय मग मंडळी, कसा वाटला तुम्हाला जान्हवी कपूरचा हा हटके अवतार? तुम्हाला जर जान्हवीचा हा नवा लूक आवडला असेल तर आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर कळवा. आमचा हा लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

You might also like