एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

इतक्या कोटीच्या संपत्तीच्या मालक आहे बॉलिवूड स्टार सनी देओल, जगतो राजा सारखी लाईफ! कोट्यवधी रुपयांची बुलेटरप्रूफ कार..

नमस्कार
मित्रहो फिल्म इंडस्ट्रीत अनेक मोठमोठे सुपरस्टार आहेत, अगदी देशविदेशात त्यांचे चाहते पसरलेले असतात. हे सुपरस्टार आपल्या उत्कृष्ट अभिनयातून आणि मनमोहक लुक द्वारे अनेकांच्या मनात सहज स्थायिक होतात. लोकप्रियतेसह बघता बघता हे खूप श्रीमंत देखील होतात,

त्यांची श्रीमंती पाहून कोणत्याही सामान्य माणसाला त्यांचा हेवाच वाटेल. पण त्यासाठी त्यांनी मेहनत देखील खूप जास्त घेतलेली असते, अगदी काही वेळा जीव सुद्धा धोक्यात घातलेला असतो. म्हणून हे सुपरस्टार चंदेरी दुनियेतील अविस्मरणीय तारे बनतात. आज आपण या ताऱ्यांपैकी एका ताऱ्याबद्दल खास माहिती जाणून घेणार आहोत.

सुपरस्टारच्या यादीत वरचढ असणारे सनी देओल अनेकांच्या मनात घर करून आहेत, त्यांनी आपल्या अभिनयातून विशेष ओळख मिळवली आहे. त्यांचे बरेचसे चित्रपट प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाले आहेत, या चित्रपटातून त्यांनी प्रत्येक वेळी एका नव्या जोमाने रसिकांना भेट दिली आहे.

त्यांच्या अनेक भूमिका प्रेक्षकांना दिवाने करतात. सनी देओल हे फिल्म इंडस्ट्रीत एक नामवंत कलावंत आहेत. आपल्या कलेचा आदर करत त्यांनी प्रत्येक भूमिका रंजक बनवली आहे, म्हणून आजही त्यांना विशेष आदर लोकप्रियता मिळते. जशी त्यांची लोकप्रियता अफाट आहे तशीच त्यांची श्रीमंती देखील अफाट आहे. आज आपण त्यांच्या संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत.

सनी देओल हे अभिनेता तर होतेच पण आता ते एक उत्तम नेता देखील आहेत. चंदेरी दुनियेतील हा तारा राजकारणातील दुनियेत सुद्धा खूप चमकत आहे. सध्या सनी देओल चित्रपट सृष्टीपासून दूर असतात पण ते राजकारणात खूप सक्रिय असून भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत.

गेल्या काही काळापासून ते गुरुदासपूरच्या संसद पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना त्यांचा खुप अभिमान वाटतो. एक उत्कृष्ट लोकप्रिय अभिनेत्यासह आता ते लोकप्रिय नेता सुद्धा बनले आहेत त्यामुळे लोकप्रियता आणि पैसा दोन्हीही त्यांच्याकडे भरभरून आहे.

सनी देओल यांचे वैयक्तिक आयुष्य खूप लक्झरीयस आहे, पण ते आपले वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त माहिती देत नाहीत. पण लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्या संपत्तीचा आढावा समोर आला होता, त्यांच्या संपत्तीबद्दल जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल.

सनी देओल हे ऐकून ९० करोडचे मालक आहेत, ही किंमत पाहून सामान्य माणूस चकितच होऊन जाईल पण ही रक्कम २०१९ दरम्यानची होती. सनी देओल यांच्या अनेक गाड्या, बंगले आहेत ज्यामध्ये एकाची किंमत करोडोंच्या घरात मोजली जाते.

तसेच सनी यांचा मुंबई मध्ये देखील एक आलिशान बंगला आहे, ज्याची किंमत करोडो रुपये आहे. हा बंगला सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याजवळच आहे. हा बंगला आतून आणि बाहेरून खूप सुंदर आहे, करोडोंच्या किंमतीत तो तोलला जातो. सनी देओल हे आपल्या कुटुंबासह याच बंगल्यात राहतात.

सनी यांचे असे खूपसे सुंदर बंगले आहेत, तसेच त्यांना निरनिराळ्या गाड्यांची सुद्धा खूप आवड आहे. त्यांच्याकडे खूपशा गाड्या आहेत त्यामध्ये टोयोटा, रेंज रोवर, तसेच अगदी ऑडी पर्यंतच्या गाड्या आहेत. तसेच त्यांच्या कडे लेम्बोर्गिनी नावाची सुंदर स्पोर्ट्स कार देखील आहे.

सनी देओल हे एक नामवंत श्रीमंत व्यक्ती आहेत, त्यामुळे त्यांचे चाहते त्यांचा खूप आदर करतात. त्यांच्या कुटुंबातील धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हे देखील राजकारणात दिसून येतात. पण राजकारणात प्रवेश करण्याआधी या सर्वांनी आपला चाहता वर्ग खूप मोठा बनवला आहे, म्हणून तर आजही त्यांचे चित्रपट आवडीने पाहिले जातात.

सनी देओल आणि त्यांच्या परिवाराला पुढील आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर देखील जरूर करा.

You might also like