एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील मोहित आहे खऱ्या आयुष्यात विवाहित! ही आहे त्याची पत्नी…

झी मराठी वाहिनी वरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. यातली स्वीटू आणि ओमची स्वीट लव्ह स्टोरी लोकांना आवडू लागली आहे. जशी मुख्य पात्रं प्रेक्षकांची आवडती असतात, तशी काही खलनायकी पात्रंही लोकांना आवडून जातात.

तसेच या मालिकेतील मालविका आणि मोहितच्या बाबतीत झाले आहे. यात मालविकाची व्यक्तिरेखा अभिनेत्री आदिती सारंगधरने साकारली आहे, तर मोहितची व्यक्तिरेखा अभिनेता निखिल राऊत साकारत आहे.

‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ मधून नावारुपास आलेल्या निखिलने अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये कामे केली आहेत. गेली १९ वर्षे निखिल मराठी मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहे. निखिलने अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले आहे. राजा शिवछत्रपती, तू तिथे मी, काहे दिया परदेस, जयोस्तुते, अस्मिता यांसारख्या मालिकांमध्ये त्याने काम केले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by NIKHIL RAUT Official 🧿 (@nikhilrautofficial)

यामधील ‘काहे दिया परदेस’ मधील विकीच्या भूमिकेने त्याला छोट्या पडद्यावर ओळख मिळवून दिली. अनुत्तरित, निर्णय, आचमन सारख्या शॉर्ट फिल्म्सही त्याने केल्या आहेत.

गाढवाचं लग्न, सामसूम, शेवग्यचा शेंगा, सुरक्षित अंतर ठेवा, चॅलेंज यांसारख्या नाटकांमध्ये काम करत त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. वळू, तांदळा, मणी मंगळसूत्र, आईची साथ करी जगावर मात, बोकड, याला जीवन ऐसे नाव, फर्जंद, फत्तेशिकस्त यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने केलेल्या भूमिकांनी त्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सक्सेस अनलिमिटेड, जागर महाराष्ट्राचा, गुड मॉर्निंग महाराष्ट्र अशा कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाची धुरा निखिलने खूप उत्तम रीतीने सांभाळली आहे.

निखिलने आता जरी आपल्या मेहनतीने अभिनय क्षेत्रात नाव कमावलं असलं, तरी यश काही नेहमीच त्याच्या नशिबी नव्हतं. सर्वसाधारण कुटुंबात जन्माला आलेल्या निखिलच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. काही कारणाने वडिलांची नोकरी गेली आणि त्यांना हलाखीच्या दिवसांचा सामना करावा लागला.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mayuri Raut (@mayuri_n_raut)

घरखर्चाला हातभार लागावा म्हणून वडिलांनी घेऊन दिलेल्या सायकलवरून निखिल घरोघरी दूध पोचवण्याचे काम करत असे. त्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्याच्या आईने त्याच्या या आवडीला पाठींबा दिला. आज त्याच्या यशाचे श्रेय निखिल आपल्या आईला देतो.

अशीच अजून एक व्यक्ती त्याच्या आयुष्यात आहे जी त्याला नेहमी साथ देते. ती आहे निखिलची बायको मयूरी. या दोघांचे लग्न २२ एप्रिल २०१४ ला झाले. मयूरी केवळ दिसायलाच सुंदर नाही, तर आपल्या कामातही हुशार आहे. ती एक वेडींग प्लॅनर आणि क्लासिकल डान्सर आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by NIKHIL RAUT Official 🧿 (@nikhilrautofficial)

You might also like