एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील रॉकी ची आई आहे ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री!

झी मराठी वाहिनी वरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत सध्या स्वीटू आणि ओमला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. स्वीटू आणि ओमचे लग्न होऊ न शकल्याने प्रेक्षकांचे मन दुखावले आहे. त्यामुळे ते दोघे लवकरात लवकर एकत्र यावेत अशी प्रार्थना प्रेक्षक करत आहेत. मालिकेतील व्यक्तिरेखांनी आणि कलाकारांनी या मालिकेची गोडी वाढवली आहे. मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या आवडीच्या बनल्या आहेत. यातील अशीच एक व्यक्तिरेखा म्हणजे रॉकी.

रॉकीची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे नाव आहे त्रिगुण मंत्री. त्रिगुणने या आधीही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेने त्याला विशेष ओळख मिळवून दिली आणि तो आता घराघरांत पोचला आहे. विशेष म्हणजे त्रिगुणने मराठीपेक्षा हिंदी मध्ये अधिक काम केले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Triyugg Mantri (@triyugg)

१५ सप्टेंबर ला जन्मलेल्या त्रिगुणने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात २०१० मध्ये केली. ‘प्लेबॅक’ या हिंदी चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. नगरसेवक- एक नायक (२०१७), अजिंक्य (२०२०) यांसारख्या मराठी चित्रपटांत त्याने काम केले आहे.

कुल्फीकुमार बाजेवाले, सम्राट त्रिगुणने बऱ्याच हिंदी मालिकांमध्येही काही वैशिष्ट्यपूर्ण भूमिका निभावल्या आहेत. भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप, संकटमोचन महाबली हनुमान, विघ्नहर्ता गणेश, सम्राट अशोक अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये त्याने निभावल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस ठरल्या आहेत.

त्रिगुण अभिनेता असण्याबरोबरच एक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट देखील आहे. तसं पाहायला गेलं, तर त्रिगुणच्या उत्तम अभिनय गुणांची पाळेमुळे त्याच्या घरातच आहेत हे लक्षात येईल. कारण त्याचे आई आणि वडील दोघेही मनोरंजन क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्ती आहेत.

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की त्रिगुण मंत्री एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे सुलभा मंत्री. सुलभा यांनी टपाल, धुमशान, चोर बाजार, पूर्णसत्य, प्रेमासाठी वाट्टेल ते, भोळा शंकर, आधारस्तंभ, आमची माती आमची माणसं यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Triyugg Mantri (@triyugg)

चित्रपटांसोबतच त्यांनी काही मालिकांमध्येही काम केले आहे. दामिनी, साराभाई व्हर्सेस साराभाई या त्यांच्या काही गाजलेल्या मालिका. २०१३ मध्ये वयाच्या ६३ व्या वर्षी सुलभा मंत्री यांचे निधन झाले. त्रिगुण मंत्रीचे वडील नितीन मंत्री देखील याच क्षेत्रात काम करतात. त्यांनी ‘सरनोबत’ या नाटकात काम केले होते.

You might also like