एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत स्वीटू याप्रकारे पुन्हा भेटणार ओमला, असा होणार सुखदायी शेवट..

झी मराठी असो किव्हा मग कलर्स मराठी खूप साऱ्या मालिका सध्या हिट लिस्ट वर आहेत, पण अचानक यात बिग बॉस गुसल्यामुळे मालिकांचा टीआरपी ढासळेल का अशी शंका व्यक्त होत आहे, मालिकेचे लेखक मालिका अजून प्रसिद्धी होऊ दे म्हणून वेगवेगळे ट्विस्ट त्यात आणत आहे.

आज आम्ही मालिका जगतातील अश्याच एक व्हायरल मालिकेबद्दल बोलणार आहोत जी सध्या खूप चर्चेच्या घरात आहे. झी मराठी वाहिनीवर खूप कमी काळात खूप साऱ्या जनांचे मनोरंजन करणारी मालिका “येऊ कशी तशी मी नांदायला” सध्या एका वेगळ्या वळणावर येऊन पोहचली आहे. या मालिकेतील सगळेच कलाकार अगदी प्रेक्षकांना खूप आवडतं असतात. या मालिकेची स्टोरी म्हणजे ओम आणि स्वीटूची भन्नाट स्टोरी! यामुळे ही मालिका दिवसेंदिवस फार फेमस होताना दिसून येत आहे.

आता तुम्ही जर ही मालिका पाहत असाल तर मालिकेला एका वेगळ्या वळणावर घेऊन जाण्यात आले आहे ते म्हणजे स्वीटू आणि मोहित यांचे या मालिकेत लग्न दाखवण्यात आले आहे, चाहत्यांना हा भाग आवडला नाही असे दिसत आहे. मालिकेत या दोघांचे लग्न दाखवायची काय गरज होती असे प्रेक्षक सध्या म्हणत आहेत. या मराठी मालिकेत तुम्ही हे देखील पाहिले असेल की कसे मैथिली ही स्वीटू आणि मोहित याना जवळ करण्याचा प्रयत्न करत असते.

पण या मालिकेत एक सर्वात सुंदर अभिनय करणारी शंकू मावशी प्रेक्षकांच्या मनात घर करून जाते, शंकू मावशी हे पात्र अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी निभावले आहे, शुभांगी यांनी आत्तापर्यंत खूप साऱ्या मालिका चित्रपटात काम केली आहेत. तुम्हाला आठवत असेल तर याआधी शुभांगी गोखले या ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या मालिकेत दिसल्या यामुळे त्या खूप प्रसिद्ध झाल्या होत्या. याचबरोबर या मालिकेतील खूप सारे कलाकार प्रेक्षकांच्या मनात उतरत आहेत “येऊ कशी तशी मी नांदायला” या मालिकेतील आणखी एक गाजलेले पात्र म्हणजे अर्णव.

तुम्ही मालिकेत पाहिले असेल की ओम जेव्हा घरी नसतो तेव्हा स्वीटू शकू मावशी यांना उत्तम प्रकारे संभाळत असते. मात्र या मालिकेत नवीन ट्विट्स आला तो म्हणजे मोहित आणि स्वीटूचे लग्न त्यामुळे ते सध्या दोघे एकत्र राहताना दिसून येत आहेत. मात्र लग्नानंतर तिला याबद्दल खरी बातमी समजली आहे की लग्न मंडपातून पळून जात ओम ने लग्न का मोडले ? याचे कारण जेव्हा तिच्या समोर येते तेव्हा तिच्या पायाखालील जमीन सरकते. पण झाले असे की ओम हा स्वीटूच्या वडिलांना वाचवण्यासाठी धावत सुटतो. जेव्हा हे कारण स्वीटू समोर पोहचले आहे तेव्हा तिला खूप दुःख झाले आहे. आता पुढील भागात स्वीटू पुन्हा ओम ला जाऊन भेटेल आणि लग्न करणार आहे अशी शक्यता दिसत आहे. त्यामुळे मालिका पाहत राहा आणि काय वाटत कमेंट्समध्ये कळवा.

You might also like