एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

या प्रसिद्ध तमिळ अभिनेत्रीचा अ’पघात! मित्राचा घटनास्थळी मृ’त्यू..

तमिळ बिग बॉस फेम तमिळ मॉडेल आणि अभिनेत्री याशिका आनंद हिचा गंभीर अप’घात झाला असून या अप’घातात तिच्या मित्राचा जागीच मृ’त्यू झाला आहे. याशिकाने बऱ्याच तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१६ ला प्रदर्शित झालेल्या ‘धुरुवंगल पाथिनारु’ या तमिळ चित्रपटाने तिला प्रकाशझोतात आणले. या अप’घातात अजून दोघे जखमी झाले आहेत.

शनिवारी रात्री याशिका आनंद तिच्या तीन मित्रांना भेटायला गेली. हे चौघेही मामल्लापुरम ला गेले होते. तिचा एक मित्र वलिचट्टी भवानी हा युके वरून चार दिवसांपूर्वीच भारतात आला होता. त्याला परत युके ला जायचे असल्याने चौघेही रात्रीच परत आपल्या एसयूव्ही मधून चेन्नई ला रवाना झाले.

वाटेत गाडी चालवत असताना याशिकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी डिव्हायडर ला धडकून रस्त्याकडेच्या रेलिंग ला धडकली आणि पुढे खड्ड्यात जाऊन पडली. यामध्ये पॅसेंजर सीट वर बसलेल्या भवानीचा जागीच मृ’त्यू झाला, तर याशिका गंभीर जखमी झाली आहे.

त्यांचे बाकी दोन मित्र मागे बसले होते. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अप’घात झाल्यानंतर घटनास्थळावरील लोकांनी धाव घेत या चौघांना जवळच्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले. मात्र त्यापूर्वीच हैद्राबाद स्थित सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या २८ वर्षीय भवानीचा मृ’त्यू झाला होता.

त्याचा मृ’तदेह पोलिसांनी पोस्ट-मार्टम साठी पाठवला आहे. दरम्यान किरकोळ दुखापत झालेले मित्र खासगी रुग्णालयात दाखल झाले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ईस्ट कोस्ट रोड वरून रात्री बाराच्या दरम्यान याशिका आणि तिचे मित्र चेन्नई कडे येत होते. सुलेरीकडू च्या आसपास गाडी आली असताना गाडीचा वेग नियंत्रित न झाल्याने याशिकाचे नियंत्रण सुटले आणि हा अ’पघात झाला. या अप’घातात याशिकाच्या मानेला दुखापत झाली असून तिच्या कमरेचे हाड मोडले आहे. ती चालवत असलेल्या एसयूव्ही गाडीच्या मागच्या भागाचा चेंदामेंदा झाला आहे.

पोलिसांनी ही केस दाखल करून घेतली असून त्याची चौकशी सुरू आहे. रॅश ड्रायव्हींग आणि दुर्लक्ष केल्याने मृ’त्यू असा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. प्राथमिक तपासात याशिका ने दारू पिऊन गाडी चालवली नसल्याचे निष्पन्न झाले.

गाडीचा वेग नियंत्रित करता न आल्याने हा अप’घात झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. अप’घाताचे खरे कारण तपासाअंती समोर येईलच.

You might also like