एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘या’ मराठी कलाकार जोडीला लागले नव्या पाहुण्याचे वेध! लवकरच हलणार पाळणा…

एखाद्या जोडप्याच्या घरी येणारी छोटी पावले नेहमीच आनंद घेऊन येत असतात. सध्या अनेक सेलिब्रेटींनी त्यांच्या घरी नव्या पाहुण्यांचे स्वागत केले आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी आपली ही गुड न्यूज सोशल मीडिया द्वारे चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. काही मराठी कलाकारांनी देखील त्यांच्या घरी पाळणा हलला असल्याची किंवा हलणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. या यादीत आता अजून एका जोडीची भर पडणार आहे.

या जोडीचं नाव आहे . खुशबूने अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. एक मोहोर अबोल, तू भेटशी नव्याने, तेरे लिए या तिच्या काही गाजलेल्या मालिका. ‘देवयानी’ मालिकेमुळे संग्राम साळवी हे नाव घराघरांत पोचलं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ख़ुशबू (@khushbootawdeofficial)

विशेष म्हणजे खुशबूने देखील या मालिकेत तारा नावाची एक छोटी भूमिका साकारली होती. संग्रामने मालिकांबरोबरच नाटक आणि शॉर्ट फिल्म्स मध्ये देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सरस्वती, कुलस्वामिनी, पन्हाळा, दगडाबाईची चाळ, झाला बोभाटा, ऍटॅक या त्याच्या काही गाजलेल्या कलाकृती.

सध्या हे दोघे प्रचंड खूष आहेत. संग्रामने खुशबूच्या वाढदिवसादिवशी सगळ्यांना ही गुड न्यूज दिली आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर त्याने त्याचा आणि खुशबूचा फोटो शेअर करत खुशबूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात खुशबू आपला बेबी बंप बरोबर खूप आनंदी दिसत आहे. खशबूने देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर ही खुशखबर चाहत्यांना दिली. चाहत्यांबरोबरच चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी देखील या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ख़ुशबू (@khushbootawdeofficial)

संग्रामने दोघांचा फोटो पोस्ट करत त्यावर कॅप्शन लिहिली आहे, की “होणाऱ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा! तुला त्रास देणारा आता मी केवळ एकटा नसेन. माझ्याबरोबर मस्ती करणाऱ्या पाहुण्याची मी आतुरतेने वाट पहात आहे.” तर खुशबूने आपल्या अकाऊंट वर दोघांचा फोटो शेअर करत लिहिले आहे, की “आम्ही आमच्या कुटुंबात अजून थोडे प्रेम वाढवत आहोत.”

लवकरच दोनाचे तीन होणार असल्याचा आनंद या दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. दोघांनी आपला एक छोटासा व्हिडिओ देखील अपलोड केला आहे. लवकरच आपल्याला यांच्या घरी येणारं बाळ हे छोटा पाहुणा आहे की छोटा पाहुणी आहे हे कळेलच. तोपर्यंत या दोघांना त्यांच्या आई-बाबा होण्याच्या या सुरेख प्रवासासाठी शुभेच्छा!

You might also like