एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अनाथ मुलांना दत्तक घेऊन या ७ सुप्रसिद्ध कलाकारांनी त्यांना दिले नवीन आयुष्य! या तर अभिनेत्री केले..

मित्रहो या जगात कोणीही कोणाचे नसते , असे प्रत्येक जण म्हणतो पण माणुसकी हा एक असा धर्म आहे ज्यामध्ये माणूस हा माणसाचा साथी असतो. जगात भरपूर मुले अनाथ असतात, त्यांच्या आयुष्यात सोयी सुविधा जरी मिळाल्या तरीही त्यांना प्रेम कधी मिळत नाही आणि आपल्यातील खूप कमी लोक असतात जे त्यांना निस्वार्थीपणे सांभाळतात.

अन्यथा मग त्यांच्यासाठी अखेर आश्रम आहेतच पण तरीही त्यांना सुद्धा वाटत असणार की त्यांचेही कोणी पालक असते तर..पण आपल्या बॉलिवूड मधील या दिग्गज कलाकारांनी अनाथांना आपला आधार दिला आहे.

म्हणतात की श्रीमंत लोक गरिबांचा आदर करत नाहीत पण या ७ कलावंतांनी दाखवून दिले की माणुसकी ही श्रीमंतीहून श्रीमंत असते.

रविना टंडन:
यामध्ये बॉलिवूड मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री रविना टंडन हिचा देखील समावेश होतो, तीने आपल्या उत्कृष्ट अभिनयातून आणि सौंदर्याने भरपूर लोकप्रियता मिळवली आहे. तीचे भरपूर चित्रपट प्रसिद्ध झाले आहेत, या प्रसिद्धी मधून आणि लोकप्रियते मधून ती अनेकांच्या मनात घर करून आहे.

रविनाने आपल्या कारकीर्दीतच वयाच्या २१ व्या वर्षी दोन मुलींना दत्तक घेतले होते आणि त्या मुलींचा सांभाळ केला आहे, सध्या त्या मुलींची लग्ने देखील झाली आहेत. एकटीचे नाव छाया आहे तर दुसरीचे नाव पूजा आहे, अविवाहित असताना रविनाने यांना दत्तक घेतले होते. यानंतर रविनाने अनिल थडानी सोबत लग्न केले होते.

प्रीती झिंटा:
प्रीती झिंटा या अभिनेत्रीचे नाव सुद्धा सात जणांच्या यादीत घेतले जाते, प्रितीने आपल्या मनोरम कलेतून भरपूर लोकप्रियता मिळवली असून तीच्या अनेक भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत. तीचे काही चित्रपट आजही खूप आवडीने पाहिल्या जातात, तीचा कोई मिल गया हा चित्रपट तर खूपच गाजलेला आहे.

सौंदर्यामुळे आणि उत्कृष्ट अभिनयामुळे तर। प्रिती लोकप्रिय आहेच पण तीच्या उदार मनामुळे देखील ती चाहत्यांच्या मध्ये चर्चेचा विषय असते, तीने माणुसकीला सलामी देत एक किंवा दोन मुलं नसून एकूण ३४ मुलांना दत्तक घेतले आहे. ऋषिकेश आश्रम मध्ये ही मुले असतात आणि ती नेहमीच त्यांना भेटण्यास जात असते.

सुष्मीता सेन:
बॉलिवूड मधील सर्वात बोल्ड आणि हॉ’ट अभिनेत्रींमध्ये तीची गणना होते. ती अजूनही अविवाहित आहे, पण तीची सुंदरता आजही खूप खुलून दिसते. तीच्या हास्यावर अनेक जण आजही फिदा आहेत, त्यामुळे अनेकजण तीला खूप पसंत करतात. तीने अविवाहित असून दोन मुलींना दत्तक घेतले आहे, त्या मुलींना ती खूप छान पद्धतीने सांभाळते. एका आईसारखा त्यांचा उत्तम रित्या सांभाळ करते. आपल्या दोन्ही मुलींवर सुष्मीता जीव ओवाळून टाकते, त्यांना तिने खूप लाडात वाढवले आहे आणि ती आपल्या दोन चिमन्यांसह खूप सुखात जगत आहे.

सलीम खान:
बॉलिवूड अभिनेते सलमान खान आणि त्यांचे पिता सलीम खान हे खूप प्रसिद्ध व्यक्ती आहेत. सलमान ने फिल्म इंडस्ट्रीत खूप लोकप्रियता मिळवली असून त्याने अनेक भूमिका निभावल्या आहेत. हे खान घराणे खूप श्रीमंत, प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. पण या परिवाराचा जीव त्यांची लाडकी मुलगी अर्पिता हिच्यामध्ये गुंतलेला आहे.

अर्पिताला सलीम खान यांनी दत्तक घेतले होते पण ती आता संपूर्ण परिवाराची लाडकी बनली आहे आणि सलमान तर तिच्यावर जीव ओवाळून टाकतात. तीने या सर्वाना खूप प्रेम दिले असून यांनीही तीला खूप छान पद्धतीने सांभाळले आहे.

मिथुन चक्रवर्ती:
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी देखील दिशानी हिला दत्तक घेतले होते, मिथुन यांनी बॉलिवूड मध्ये भरपूर नाव कमावले आहे. त्यांचा अभिनय आणि त्यांनी साकारलेल्या सर्व भूमिका अतरंगी वाटतात. रंजक अभिनयातून त्यांनी आजवर लोकांचे भरपूर मनोरंजन केले आहे आणि त्यामुळे त्यांची लोकप्रियता खूप वाढली आहे.

मिथुन यांनी दिशानी ला दत्तक घेतले होते, पण तीच दिशानी आता त्यांच्या कुटुंबातील एक लाडकी लेक बनली आहे. महाक्षय, उस्मय, नमशी हे तीनही भाऊ दिशाणीवर खूप प्रेम करतात. मिथुन यांनी दिशानी ला खूपच छान सांभाळले असून खूप प्रेम दिले आहे.

सन्नी लियोन:
सन्नीने आपल्या सुंदरते मुळे आणि मनोरम अभिनयातून भरपूर लोकप्रियता मिळवली आहे. तीचे सर्व चित्रपट तीच्या चाहत्यांना फार आवडतात. तसेच तीच्या निरागस सुंदरतेमुळे अनेकजण तीला खूप पसंत करतात.

सन्नीने निशा नावाच्या छोट्याशा सोनपरीला दत्तक घेतले आहे. तसेच सरोगेसी मार्फत ती दोन जुळ्या मुलांची आई बनली आहे, त्यामुळे सन्नी आता एकूण तीन मुलांची आई झाली असून ती आपल्या तीनही मुलांना खूप छान पद्धतीने सांभाळते आणि ती त्यांच्यासोबत खूप सुखात राहत आहे.

सुभाष घई:
सुभाष यांनी भरपूर चित्रपटांचे डायरेक्ट केले आहे, त्यांचे सर्व चित्रपट खूप सुंदर आहेत. ते आपल्या कामामध्ये जसे उत्कृष्ट आहेत तसेच त्यांचे विचार सुद्धा खूप छान आहेत. म्हणून तर त्यांनी एका अनाथ मुलीला आपला आधार देऊन तीचा सांभाळ केला आहे. तीचे नाव मेघना असून ते तीच्यावर जीवापाड प्रेम करतात. आपल्या मुलीचा सुंदर सांभाळ करतात, मेघना देखील आपल्या वडिलांवर खूप प्रेम करतात.

या सात कलाकारांनी अनाथांना आधार देऊन रसिकांच्या मनात आणखीन प्रेम भरले आहे, त्यामुळे त्यांची लोकप्रियता अजून वाढली आहे. या सर्वांनाच भरपूर आयुष्य मिळो, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर देखील जरूर करा.

You might also like