एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अभिनयात टॉप, शिक्षणात फ्लॉप! या अभिनेत्रींचे शिक्षण झाले आहे इतके…

अभिनय क्षेत्रात येणाऱ्या व्यक्ती खूप लहान वयात आपले करिअर सुरू करतात. त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांचे शिक्षण राहून जाते. बरेच कलाकार तर शिक्षण नको म्हणून इंडस्ट्री मध्ये प्रवेश करतात. अशाच काही अभिनेत्रींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

१. आलिया भट
तरुणाईच्या लाडक्या आलिया भट ने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. एका प्रसिद्ध दिग्दर्शकाची मुलगी असल्याने तिला सतत चित्रपटांच्या ऑफर्स येत असत. त्यामुळे तिला बारावीनंतर शिक्षण सोडावे लागले.

२. दीपिका पदुकोण
आपल्या सुंदर अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेणारी अभिनेत्री दीपिका बंगळूरमधील माउंट कार्मेल स्कूल मधून शिक्षण घेतले. पुढील अभ्यासासाठी तिने IGNOU मध्ये ऍडमिशन घेतले, पण मॉडेलिंगच्या कामामुळे ती अभ्यासावर लक्ष केंद्रीत करू शकली नाही.

३. कतरीना कैफ
वयाच्या चौदाव्या वर्षी मॉडेलिंग मध्ये करिअर सुरू करणारी कतरीना शाळेत जाऊ शकली नाही. तिचे कुटुंब सतत देश बदलत असल्यामुळे लहानपणी ती शाळेत जाऊ शकली नाही. तिने घरीच शिक्षण घेतले.

४. कंगना राणावत
आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये नाव कमावणारी अभिनेत्री कंगना बारावीत नापास झाली. तिने पुढे शिकण्याचा विचार सोडून दिला. मॉडेलिंग करिअर साठी तिने आधी दिल्ली आणि नंतर मुंबई गाठली.

५. प्रियांका चोप्रा
२००० मध्ये विश्वसुंदरी म्हणून प्रसिद्ध झालेली आणि नंतर आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. तिला आपले पदवी शिक्षण पूर्ण करून गुन्हेगारी मानसशास्त्रज्ञ व्हायचे होते. मात्र चित्रपट आणि मॉडेलिंग च्या असाइनमेंट्समुळे तिला आपले पदवी शिक्षण पूर्ण करता आले नाही.

६. काजोल देवगण
बॉलिवूडमधील हुशार आणि सुंदर अभिनेत्रींमध्ये काजोलची गणना होते. मात्र तिला आपले शालेय शिक्षण पूर्ण करता नाही आले. वयाच्या १७ व्या वर्षी तिने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.

७. सोनम कपूर
बॉलिवूडची फॅशन दीवा सोनम कपूर ने मुंबईतील आर्या विद्या मंदीर मधून आपले बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे तिने पदवीसाठी प्रवेशदेखील घेतला, मात्र पदवी अभ्यासक्रम अर्ध्यावर सोडत तिने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले.

८. करिश्मा कपूर
९० चे दशक गाजवलेली अभिनेत्री म्हणजे करीना कपूर ची मोठी बहीण करिश्मा कपूर. ऐकून आश्चर्य वाटेल, पण करिश्मा केवळ पाचवी पास आहे. सहाव्या इयत्तेत असताना तिने शाळा सोडली आणि चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

You might also like