एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीला करायचे आहे ‘बाहुबली’ प्रभासशी लग्न, स्वतः केला खु’लासा..

‘बाहुबली’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि सगळा भारत प्रभासला ओळखू लागला. नुसताच ओळखू लागला नाही, तर अनेक तरुणींच्या हृदयातला तो राजकुमार बनला. प्रभासचा अप्रतिम अभिनय आणि डॅशिंग व्यक्तिमत्व पाहता या गोष्टीचे एवढे आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. ‘बाहुबली’ चित्रपटानंतर प्रभास भलताच लोकप्रिय झाला असून अनेक निर्माते त्याला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी उत्सुक आहेत.

सध्या प्रभास ‘आदिपुरुष’ या चित्रपटात रामाची भूमिका करणार असल्याचे निश्चित झाले आहे. या बहुचर्चित चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे. चित्रपटात रावणाची भूमिका सैफ अली खान करणार असल्याचे कळते आहे. चित्रपटातील मुख्य नायिका म्हणजेच सीतेची व्यक्तिरेखा कोण साकारणार याबद्दल अनेक तर्क लावले जात होते.

अनुष्का शेट्टी, कियारा अडवाणी, अनुष्का शर्मा या अभिनेत्रींची नावे समोर येऊ लागली होती. आता मात्र या चित्रपटात सीतेची भूमिका करण्यासाठी अभिनेत्री क्रिती सॅनॉनची निवड झाल्याची बातमी येत आहे.

सध्या सगळ्यांच्या स्वप्नातली ‘परम सुंदरी’ बनलेल्या क्रितीला सध्या ‘यंदा कर्तव्य आहे’ ची स्वप्नं पडायला लागली आहेत. तिच्या ‘मिमी’ या चित्रपटामुळे ती सध्या चर्चेत आहे. तिच्या या चित्रपटातल्या कामाची बरीच चर्चा होताना दिसत आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी तिची वर्णी लागल्यानंतर तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी तिला कुणाशी लग्न करायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला होता.

क्रितीला तिच्या डे’टीं’ग बद्दल देखील यावेळी प्रश्न विचारण्यात आला. ती सध्या कोणाबरोबर रि’ले’श’नशिप मध्ये आहे का, तसेच ती कोणाबरोबर लग्न करणार याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता दिसून येते. या प्रश्नासाठी तिला तीन पर्यायदेखील देण्यात आले होते. तिला कार्तिक आर्यन, टायगर श्रॉफ आणि प्रभास असे पर्याय देण्यात आले होते.

तर यावेळी तिने तिला प्रभासशी लग्न करायला आवडेल असे सांगितले. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची आधीच खूप चर्चा आहे. आता क्रितीच्या या वक्तव्यामुळे लोक आतुरतेने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहू लागले आहेत.

हिरोपनती (२०१४), दिलवाले (२०१५), बरेली की बर्फी (२०१७), राबता (२०१७), हाऊसफुल ४ (२०१९), पानिपत (२०१९), लुकाछुपी (२०१९), मिमी (२०२१) यांसारखे अनेक हाऊसफुल चित्रपट क्रितीने दिले आहेत. अनेक तेलगू चित्रपटांमधूनही तिने आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली आहे. त्यामुळे ‘आदिपुरुष’ मधील तिच्या भूमिकेसाठी तिचे चाहते फारच उत्सुक आहेत.

You might also like