एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

प्रसिद्धी मिळताच या अभिनेत्रींनी बदलली आपली खरी नावे! ही आहेत या सुप्रसिद्ध अभिनेत्रींची जुनी नावे..

चित्रपटसृष्टीत नाव बदलणे ही काही आता विशेष बाब राहिलेली नाही. खूप आधीपासून लोकांना आवडतील आणि सहज लक्षात राहतील अशी नावे कलाकरांना देण्याची पद्धत होती. खूपदा ही गोष्ट अभिनेत्यांच्या बाबतीत घडत असली तरी अनेक अभिनेत्रींनी देखील आपली नावे बदलून घेतली आहेत. कधी कधी अशा अभिनेत्रींना लाँच करणारे दिग्दर्शक त्यांना साजेसे नाव सुचवतात. ते नाव प्रसिद्ध झाले, तर तेच नाव पुढे अभिनेत्री वापरतात. अशाच काही अभिनेत्रींच्या खऱ्या नावांबद्दल आज जाणून घेऊया..

अनुष्का शेट्टी: ‘बाहुबली’ फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टीचे खरे नाव स्वीटी शेट्टी आहे. चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवल्यानंतर तिचे नाव बदलून ‘अनुष्का’ ठेवण्यात आले. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अनुष्काने आपल्या अभिनय कौशल्याने बरेच नाव कमावले आहे.

शिल्पा शेट्टी: शिल्पा शेट्टीची आई ज्योतिषशास्त्र विशेषज्ञ आहे. तिने शिल्पाला आपले खरे नाव बदलून ‘शिल्पा शेट्टी’ असे नाव ठेवायला सांगितले. शिल्पाचे खरे नाव अश्विनी आहे. सध्या शिल्पा ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ ची जज म्हणून काम करत आहे.

अनिता हसनंदानी: अनेक हिंदी मालिका आणि हिंदी तसेच तमिळ, तेलगू व कन्नड चित्रपटांमध्ये काम करणारी अनिता हसनंदानी चे खरे नाव नताशा हसनंदानी आहे. काव्यांजली, ये है मोहोब्बतें आणि नागीन या तिच्या गाजलेल्या मालिका आहेत.

मिरना:  मेननमल्याळम आणि तमिळ चित्रपटांतील गाजलेलं नाव म्हणजे मिरना मेनन. तिचं खरं नाव अदिती मेनन आहे.

कियारा अडवाणी: ‘कबीर सिंग’ (२०१९) चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेली कियारा अलीकडे खूपच लोकप्रिय झाली आहे. तिचे खरे नाव आलिया अडवाणी आहे.

अनाका पॉल: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री म्हणजे अनाका पॉल. तिने तमिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिचे खरे नाव अमला पॉल आहे.

राखी सावंत: आपल्या वा’द’ग्रस्त वक्तव्यांनी कायम चर्चेत असलेली कलाकार म्हणजे राखी सावंत. तिचे खरे नाव नीरू भेडा आहे.

मंडळी, तुम्हाला यातील कोणत्या अभिनेत्रींची खरी नावे आधीपासूनच माहीत होती? आम्हाला नक्की सांगा. तसेच, तुम्हाला यातील कोणत्या अभिनेत्रींचे खरे नाव ऐकून ध’क्का बसला, तेही आम्हाला ऐकायला आवडेल. कमेंट्स मध्ये तुमची मते जरूर मांडा. तुम्हाला आमचा हा लेख आवडला असल्यास नक्की लाईक करा. तसेच तुमच्या मित्रमंडळींबरोबर तुम्हाला आवडलेले लेख शेअर करायला विसरू नका.

You might also like