एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

या अभिनेत्रीला निर्मात्याने केले होते ३ महिने कैद! अखेर बाळासाहेबांच्या मदतीने झाली सुटका..

मराठी चित्रपटसृष्टीत विनोदी अभिनेत्यांची संख्या जितकी जास्त आहे तितकीच विनोदी अभिनेत्रींची संख्या तुलनेने कमी आहे. या विनोदी अभिनेत्रींमध्ये एक नाव आवर्जून घ्यावं लागेल, ते म्हणजे सुप्रिया पाठारे यांचं. भावनिक प्रसंगांना त्या जितक्या हळूवारपणे निभावून नेतात, तितक्याच ताकदीने त्या विनोदी भूमिकांमध्येही धमाल आणतात. सुप्रिया पाठारे यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

अनेक ठिकाणी काम करताना कलाकारांना वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. कधी हे प्रसंग आयुष्यभराच्या गोड आठवणी देऊन जातात, तर काही डोळ्यांत पाणी ठेवून जातात. काही प्रसंग कितीही वर्षांनंतर आठवले तरी हसवून हसवून लोटपोट करतात, तर काही प्रसंग अंगावर शहारे आणतात.

सुप्रिया पाठारे अनेक वर्षं मराठी इंडस्ट्री मध्ये काम करत आहेत. त्यांनाही अशा प्रसंगांना सामोरे जावं लागले आहे. धडकी भरवणारा एक प्रसंग मात्र त्यांच्याबाबतीत असा घडला, जो त्या कधीच विसरू शकणार नाहीत.

डार्लिंग डार्लिंग, हीच माझी राणी ही सुप्रिया पाठारेंची गाजलेली नाटकं. दिली सुपारी बायकोची (२००८), अनोळखी हे घर माझे (२००९), फक्त लढा म्हणा (२०११), करूया उद्याची बात (२०११), बालक पालक (२०१२), बाळकडू (२०१४), टाइमपास (२०१४), टाइमपास २ (२०१५), चि. व चि. सौ. का. (२०१७) या मराठी चित्रपटांमध्ये त्यांच्या कामाने त्यांनी धमाल आणली.

सुप्रिया पाठारे यांनी मोलकरीणबाई- मोठी तिची सावली, श्रीयुत गंगाधर टिपरे, होणार सून मी या घरची, पुढचं पाऊल, पिंजरा, कुलवधू, जागो मोहन प्यारे, अस्सं माहेर नको गं बाई! या मालिकांमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. ‘फू बाई फू’ मधील त्यांनी फुलवलेल्या हास्यलहरी क्वचितच कोणी प्रेक्षक विसरू शकेल.

अशा या हास्यसम्राज्ञीने एका मुलाखती दरम्यान १९९५ साली घडलेला एक किस्सा ऐकवला ज्याने सगळेच थक्क झाले. एका चित्रपट निर्मात्याने त्यांना ३ महिने चक्क एका खोलीत डांबून ठेवले होते. केवळ घरच्यांशी बोलायची परवानगी असली तरी त्यांना फक्त हिंदीतच बोलावे लागे.

तशाही परिस्थितीत संधी मिळताच त्यांनी आपल्या बहिणीला खरी गोष्ट सांगितली. सुप्रिया यांची त्या निर्मात्यापासून सुटका करण्यासाठी चक्क शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मदत घ्यावी लागली होती. अखेर सुप्रिया पाठारे यांची सुटका झाली आणि त्या या दुष्टचक्रातून बाहेर पडल्या.

You might also like