एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

आपल्या बायोपिक मध्ये या अभिनेत्यांना बघायला आवडेल… सुवर्णपदक जिंकण्यापूर्वीच नीरज चोप्राने दर्शवली होती आपली इच्छा!

ऑलिम्पिक २०२० मध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले आणि भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. भालाफेक या प्रकारात नीरजने हे सुवर्णपदक जिंकले आहे. त्यामुळे आजकाल सगळीकडे नीरज चोप्राचीच चर्चा आहे. या आधीही नीरजने राष्ट्रकुल आणि विविध आशियाई स्पर्धांमध्ये भाग घेऊन पदके जिंकली आहेत. त्यामुळेच यावेळी ऑलिम्पिक मध्ये तो सुवर्णपदक जिंकेलच याबद्दल क्रीडा रसिकांना खात्री होती.

आपल्याकडे असे एखादे व्यक्तिमत्व प्रसिद्ध झाले की त्याच्यावर चित्रपट बनवण्याची बॉलिवूडची सवय आहे. त्यामुळे साहजिकच नीरजला देखील याबाबत प्रश्न विचारण्यात आला. २०१८ मध्ये एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत नीरजला विचारण्यात आले, की त्याच्यावर जर एखादा बायोपिक बनवण्यात आला तर त्यामध्ये कोणत्या अभिनेत्याने त्याची भूमिका साकारावी असे त्याला वाटते?

यावेळी नीरजने दोन अभिनेत्यांची नावे घेत या दोन पैकी एका अभिनेत्याला आपली भूमिका करताना बघायला आवडेल असे नीरजने सांगितले होते.

आजपर्यंत बॉलिवूडमध्ये असे अनेक बायोपिक बनवण्यात आले आहेत. अलीकडे खेळाडूंवर बायोपिक बनवण्याचे प्रमाण वाढले आहे. सायना (२०२१), सांड की आँख (२०१९), सूरमा (२०१८), एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी (२०१६), अजहर (२०१६), बुधिया सिंग- बॉर्न टू रन (२०१६), दंगल (२०१६), मेरी कोम (२०१४), भाग मिल्खा भाग (२०१३), पानसिंग तोमर (२०१२) हे त्यातले काही उल्लेखनीय चित्रपट आहेत. त्यामुळे एखाद्या निर्मात्याने नीरज चोप्रावर चित्रपट बनवण्याचे मनावर घेतले तर त्यात आश्चर्य वाटायला नको.

पण जर असा चित्रपट बनवायचा झाला, तर त्यात मध्यवर्ती भूमिकेत कोणता अभिनेता असेल? नीरज चोप्राने मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे जर या दोन अभिनेत्यांपैकी एका अभिनेत्याने जर या चित्रपटात काम केले तर अर्थातच हा चित्रपट लोकांना नक्की आवडेल.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

नीरजच्या मते रणदीप हुड्डा किंवा अक्षय कुमार या चित्रपटासाठी योग्य ठरतील. नुकताच अक्षय कुमारने यावर आपला अभिप्राय दिला आहे, “नीरज स्वतः खूप छान दिसणारे व्यक्तिमत्व आहे. जर माझ्यावर कधी बायोपिक बनवण्यात आला तर माझी इच्छा आहे की त्यामध्ये नीरजने काम करावं.”

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

नीरजच्या उत्कृष्ट खेळाबरोबरच त्याची अजून एक ओळख आहे ती म्हणजे त्याचे लांब केस. रणदीप आणि अक्षय दोघेही उत्तम अभिनेते आहेत. या दोघांपैकी जो कोणी लांब केसांमध्ये छान दिसेल त्याला ही भूमिका करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आता बॉलिवूड मधला कोणता निर्माता मनावर घेतो आणि नीरज वर चित्रपट बनवतो हे पाहणे मनोरंजक ठरेल.

You might also like