एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अरारारारा…! तुम्हाला माहीत आहे का? प्रवीण तरडे यांची पत्नी आहे ‘ही’ अभिनेत्री…

आपल्या विशिष्ट शैलीने प्रवीण तरडे या रांगड्या अभिनेत्याने आपला असा खास चाहतावर्ग निर्माण केला आहे. प्रवीण तरडे केवळ एक अभिनेता नाहीये. तर तो एक दिग्दर्शक आणि संवेदनशील लेखक देखील आहे. इतकेच नाही, तर ते शेतीदेखील उत्तम करतात.

सोशल मीडिया वर ते नेहमी आपले शेतातले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. ‘शेती इकायची नसती, अशी राखायची असते’ अशी सुंदर कॅप्शन देखील त्यांनी आपल्या एका फोटोला टाकलेली आहे.

अभिनेता प्रवीण तरडे यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या रांगड्या अंदाजामुळे ते खूप पटकन डोळ्यांत भरतात. स्टँड बाय (२०११), अजिंक्य (२०१२), फॅन्ड्री (२०१३), रेगे (२०१३), लग्न मुबारक (२०१८), फर्जंद (२०१८), वेडिंगचा शिनेमा (२०१९), ट्रिपल सीट (२०१९) यांसारख्या मराठी चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘राधे’ या हिंदी चित्रपटात देखील त्यांनी काम केले आहे.

देऊळ बंद (२०१५) आणि मुळाशी पॅटर्न (२०१८) सारखे चित्रपट दिग्दर्शित आणि अभिनित करून या चित्रपटांच्या लेखनाची जबाबदारीही प्रवीण यांनी सांभाळली आहे. ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटात त्यांनी अत्यंत छोटी पण महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.

त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे फार गाजले. ‘रेगे’ चित्रपटाचे लेखनही प्रवीण यांनीच केले आहे. सध्या ते ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. या चित्रपटात भूमिका निभावत दिग्दर्शन आणि लेखनाची धुराही प्रवीण यांनी उचलली आहे.

मंडळी, तुम्हाला माहीत आहे का, की अशा हरहुन्नरी कलाकाराची पत्नी देखील एक अभिनेत्री आहे? प्रवीण यांच्या पत्नीचं नाव स्नेहल तरडे आहे. स्नेहलने देखील अनेक मराठी चित्रपट केले आहेत. चिंटू २: खजिन्याची चित्तरकथा (२०१३), देऊळ बंद (२०१५), व्हेंटिलेटर (२०१६) यांसारख्या चित्रपटांमध्ये स्नेहलने काम केले आहे. मुळाशी पॅटर्न (२०१८) मध्ये देखील स्नेहलने एक छोटीशी भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या शेवटी जी न्यूज अँकर दाखवली आहे, ती भूमिका स्नेहलने केली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @paddyprdx3

प्रवीण तरडे आणि स्नेहल यांनी २ डिसेंबर २००९ मध्ये लग्नगाठ बांधली. प्रवीण यांनी आपल्या पत्नीबद्दल एका पोस्ट मध्ये लिहिले आहे, की “दहा बाय दहाच्या खोलीत सुरू झालेला संसार तू थ्री बीएचके पर्यंत मिरवलास, तुझ्या पायगुणाने संपूर्ण चित्रच बदलले.”

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pravin Vitthal Tarde (@pravinvitthaltarde)

You might also like