एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

मकरंद अनासपुरे यांच्या पत्नीला ओळखले का? दोघांनी या चित्रपटात केलंय एकत्र काम..

आपल्या युनिक स्टाईल कॉमेडीने महाराष्ट्राला हसवणाऱ्या कलाकारांतलं एक मानाचं नाव म्हणजे मकरंद अनासपुरे. त्यांचा बोलण्याचा लहेजा, हसण्याची पद्धत, कॉमेडीचं टायमिंग या सगळ्याच गोष्टी युनिक आहेत. हसवण्याच्या बाबतीत पुढे असलेले मकरंद अनासपुरे गंभीर भूमिका निभावण्याच्या बाबतीतही मागे नाहीत बरं का! त्यांच्या अनेक चित्रपटांमधील गंभीर अभिनयाने लोकांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.

मराठीसह मकरंद यांनी हिंदी चित्रपटातही काम केले आहे. वास्तव, वजूद, यशवंत, प्राण जाए पर शान ना जाए, माय फ्रेंड गणेशा यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी कामे केली आहेत. ‘डॅम्बीस’ सारख्या चित्रपटातून त्यांनी आपल्यातले पट्कथालेखनाचे, निर्मितीचे आणि दिग्दर्शनाचे गुण दाखवून दिले. पण फार कमी लोकांना त्यांच्या पत्नीविषयी माहिती आहे.

तुम्हाला माहीत आहे का की मकरंद यांच्या पत्नीदेखील एक अभिनेत्री आहेत? हो, त्यांचे नाव आहे शिल्पा अनासपुरे. शिल्पा देखील चित्रपटसृष्टीत काम करतात. शिल्पा मूळच्या मुंबईच्या आहेत. त्यांनी अनेक नाटक आणि चित्रपटांमधून कामे केली आहेत. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण मकरंद आणि शिल्पा यांचा प्रेमविवाह आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shilpa Anaspure (@anaspures)

२००० साली ‘जाऊ बाई जोरात’ हे नाटक सुरू होते. या नाटकात काम करताना मकरंद यांची शिल्पा यांच्याशी सगळ्यात पहिल्यांदा भेट झाली. या नाटकाच्या कामादरम्यान मकरंद यांना शिल्पा आवडू लागल्या होत्या. मकरंद यांनी शिल्पा यांना लग्नाची मागणी घातली. त्यांनीदेखील होकार कळवला.

दोघांचेही इंटरकास्ट मॅरेज आहे. दोघांनी आपल्या घरच्यांना त्यांच्या या नात्याबद्दल कळवले. तसं पाहायला गेलं तर एखाद्या चित्रपटाला शोभावी अशीच ही कथा आहे. चित्रपटांमध्ये दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि घरचे जात वेगळी असल्यामुळे सतत त्या लग्नाला विरोध करत राहतात.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shilpa Anaspure (@anaspures)

पण चित्रपटातल्या पालकांसारखा मकरंद आणि शिल्पा यांच्या घरच्यांनी या लग्नाला कोणताही विरोध दर्शवला नाही. दोघांच्या घरच्यांच्या संमतीने अखेरीस ३० नोव्हेंबर २००१ रोजी औरंगाबाद येथे पारंपारिक पद्धतीने दोघांचा विवाह पार पडला. मकरंद आणि शिल्पा यांना उषा नावाची मुलगी आणि केशव नावाचा मुलगा आहे.

लग्नानंतरही शिल्पा यांनी जवळपास ५ चित्रपटांमध्ये मकरंद यांच्याबरोबर काम केले. कापूसकोंड्याची गोष्ट, तुक्या तुकविला नाग्या नाचविला, गोष्ट छोटी डोंगराएवढी हे त्यातले काही चित्रपट आहेत. मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर चालवत असलेल्या ‘नाम फाऊंडेशन’ मध्ये शिल्पा यांचा देखील खारीचा वाटा आहे.

You might also like