एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

दीपक चाहरने ज्या मुलींला प्र’पोज केलं ‘ती’ नक्की आहे तरी कोण..? वाचा सविस्तर…

बॉलिवूड चित्रपटात होण्यासारख्या सीन प्रमाणे आयपीएल सामन्यात काल एक सीन पहायला मिळाला त्यामुळे कित्येक तरी प्रियकर प्रियसीनां त्यांचे प्रेम आठवले असेल समंध प्रेक्षकांनच्या समोर दीपक चाहरने आपल्या मैत्रिणीला प्रोपोज केले त्यामुळे सध्या ही न्यूज खूप व्हायरल होताना दिसून येत आहे. पण ज्या मुलीला त्याने प्र’पोज केले ती नक्की आहे तरी कोण चला तर जाणून घेऊया…

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepak Chahar (@deepak_chahar9)

आयपीएल २०२१ मध्ये गुरुवारी एक विशेष दृश्य पाहायला मिळाले. जेव्हा चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना संपला, तेव्हा स्टँडमध्ये काहीतरी घडले ज्यामुळे हेडलाईन्स बनल्या. चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने सामना संपताच मैत्रिणीला मैदानावर प्र’पोज केल्याची बातमी तुम्हाला मिळाली असेल. जेव्हा दीपकने हे केले, तेव्हा त्याची मैत्रीण आणि आजूबाजूचे लोक हैराण झाले, विशेष गोष्ट म्हणजे हे दृश्य टीव्हीवर लाईव्ह दाखवले जात होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepak Chahar (@deepak_chahar9)

आता प्रत्येकाच्या मनात प्रश्न असा आहे की दीपक चाहरची मैत्रीण कोण आहे? दीपकच्या मैत्रिणीचे नाव जया भारद्वाज आहे. दीपके तिला सर्वांसमोर प्रो’पोज करता तिने लगेच होकार सुद्धा दिला होता. दीपकने आपल्या मैत्रिणीला सर्वांसमोर रोमँ’टिक पद्धतीने एका गुडघ्यावर बसून प्र’पोज केले आणि मने जिंकली. जया भारद्वाज बॉलिवूड अभिनेता आणि व्हीजे सिद्धार्थ भारद्वाज यांची बहीण आहे. सिद्धार्थ भारद्वाज बिग बॉसच्या ५ व्या सीझनमध्ये दिसले होते, तसेच स्प्लिट्सविला या रिअॅलिटी शोचा भाग देखील आहेत. सिद्धार्थ अजूनही त्याच्या इन्स्टाग्रामवर सतत फिटनेस संबंधित फोटो/व्हिडिओ अपलोड करतो.

आयपीएल सामन्यानंतर, जेव्हा दीपक चाहरने जया भारद्वाजला प्र’पोज केले, तेव्हा सिद्धार्थनेही त्याची बहीण आणि दीपकचे अभिनंदन केले. सिद्धार्थने लिहिले की जया आणि दीपक यांचे अभिनंदन. तसेच, सिद्धार्थने दीपकचे थेट टीव्हीवर प्र’पोज केल्याबद्दल अभिनंदन केले.

दीपक चाहरनेही त्याच्या इन्स्टाग्रामवर या खास क्षणाचा फोटो शेअर केला आणि लिहिले की त्याला प्रत्येकाचे आशीर्वाद हवे आहेत आणि सर्वांचे आभार मानायचे आहेत. दीपक चाहरची बहीण मालती चाहर देखील एक मॉडेल, अभिनेत्री आहे ज्यांनी तिच्या भावाला अभिनंदन केले. मालतीने तिच्या इन्स्टाग्रामवर लिहिले आहे की My Brother is taken! त्याचवेळी मालती यांनी असेही लिहले आहे की जया दिल्लीची मुलगी आहे, तिला कोणीही परदेशी समजू नये. त्यामुळे भारतात त्याचे जुळले आहे. असे समजते.

You might also like