एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अभिनेता अक्षय कुमारची श्रीमंती पाहून थक्क व्हाल! चित्रपटांव्यतिरिक्त आहेत इतरही कमाईची साधने…

बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये अक्षय कुमारचे नाव घेतले जाते. चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी अक्षय कुमार एक आहे. अक्षय कुमार म्हणजे सुपरहिट चित्रपट असे समीकरण गेल्या काही वर्षांत तयार झाले आहे. त्यामुळे अनेक चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक त्याला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी धडपडत असतात आणि त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला तयार होतात.

अलीकडे अक्षय कुमार वर्षाकाठी किमान ३-४ चित्रपट करताना दिसतो. चित्रपटांमधील अभिनयाव्यतिरिक्त अक्षय कुमारला जाहिरातींमधून देखील बरेच उत्पन्न मिळते. त्याच्या बऱ्याच जाहिराती सध्या टीव्ही वर सुरू आहेत. त्यामुळे त्याची कमाई कोटीच्या घरात आहे. अलीकडेच फोर्ब्स ने जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रेटींची यादी प्रसिद्ध केली.

या यादीमध्ये अक्षय कुमारचेही नाव असून या ५३ वर्षीय अभिनेत्याने या यादीमध्ये ५२ वे स्थान पटकावले आहे. फोर्ब्स च्या या अहवालानुसार अक्षय कुमारने २०२० मध्ये जवळपास ४८.५ मिलियन डॉलर्सची कमाई केली आहे. भारतीय चलनात बोलायचे झाल्यास ही किंमत ३५६ कोटी रुपये इतकी आहे.

हा खिलाडी कुमार बॉलिवूड मध्ये हिट मशिन म्हणून देखील ओळखला जातो. आजकाल अक्षय ज्या चित्रपटात असेल तो चित्रपट हमखास चालतोच. कॉमेडी असो किंवा ऍक्शन, अक्षय कुमार त्या चित्रपटात असेल तर तो चित्रपट अगदी सहज २०० कोटी चा गल्ला जमवतो.

नुकताच अक्षयने ‘लक्ष्मी’ हा चित्रपट केला होता. ट्रा’न्सजेंडर वर आधारीत या चित्रपटात कियारा अडवाणीने देखील भूमिका केली होती. हा चित्रपट २०२० मध्ये दिवाळी दरम्यान ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित करण्यात आला होता.

सध्या अक्षय कुमार त्याच्या पुढच्या चित्रपटाच्या म्हणजेच ‘अतरंगी’ च्या शूटींग मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटासाठी अक्षय कुमार ने तब्बल १२० कोटी रुपये इतकी फी आकारल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता धनुष देखील असणार आहेत. त्याच्या आगामी चित्रपटांमधील ‘सूर्यवंशी’ हा एक चित्रपट आहे.

मार्च २०२० मध्ये त्याचा ट्रेलर रिलीज झाला होता, मात्र कोरोना च्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून मुहूर्त मिळाल्याचे दिसत नाही. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री कतरीना कैफ देखील असणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटांपैकी ‘बेल बॉटम’ चे शूटींग पूर्ण झाले असून ‘बच्चन पांडे’ चे शूटींग अद्याप सुरू आहे. त्याचे रामसेतु, रक्षा बंधन, पृथ्वीराज चौहान हेदेखील चित्रपट येऊ घातले आहेत.

You might also like