एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

मंदिराच्या तलावात श्री विष्णूची मूर्ती आहे पण पाण्यात दिसतात शिवशंकर! या तलावाचे रहस्य ऐकून विश्वास बसणार नाही..

मित्रहो ही सृष्टी एक रहस्यमय दुनियाच आहे, इथे प्रत्येक वेळी एक नवी बाब समोर येते. आजही नवेनवे शोध लावले जातात आणि त्यामुळे अनेक रहस्यमय गोष्टी उदयास येतात. माणूस या सृष्टीचा एक छोटासा भाग आहे, उर्वरित सृष्टी अनेक रहस्यांनी भरलेली आहे. अनेक ठिकाणे आहेत, ज्यांना पाहताच मनात प्रश्न थैमान घालू लागतात.

त्यापैकी भारतात सुद्धा खूपशी ठिकाणे रहस्यमयी वाटतात, खास करून आपल्या पूर्वजांनी स्थापिलेली मंदिरे..भारतात भरपूर मंदिरे आहेत, त्यांचा रेखीव आकार अनेक नजरांना आकर्षित करतो. ही मंदिरे आपल्या नक्षीदार रूपातून नेहमीच परिसराचेही सौंदर्य खुलवत असतात म्हणून तर हजारो लाखो लोक यांचे सौंदर्य पाहण्यास उत्सुक असतात.

भारतातील अनेक सुंदर मंदिरांपैकी आज आपण एका मंदिराची माहिती घेणार आहोत, ज्याच्या रहस्याच्या चर्चा अनेक लोक करत आहेत. या मंदिराची रचना इतकी सुंदर आहे की कोणीही आकर्षित होऊ शकतो, याचा रेखीवपणा मनाला शांती देतो. याची उभारणी खूपच सुंदर असून आकर्षक वाटते.

हे मंदिर नेपाळच्या काठमांडुपासून १० किलोमीटर अंतरावर स्थित आहे, या मंदिरात भगवान विष्णू यांची सुंदर मूर्ती आहे. हे भगवान विष्णूचे मंदीर नेपाळ येथील शिवपुरी मध्ये स्थित आहे. हे मंदिर त्या परिसराची खूप शोभा वाढवते, म्हणून तर येथे भाविकांची नेहमीच गर्दी असते. येथे भगवान विष्णू यांची अतिशय सुंदर मूर्ती आहे.

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे भगवान विष्णू यांची झोपलेली मूर्ती स्थापन केली आहे, जी भक्तांना खूपच आकर्षक वाटते. हे मंदिर बुधनिलकंठ मंदिर म्हणून सुद्धा ओळखले जाते. या मंदिरात भगवान विष्णू यांची ही झोपलेली मूर्ती सुमारे ५ मीटर लांब आहे, व तलावाची लांबी एकूण १३ मीटर आहे.

मंदिरामुळे हे तलाव खूपच प्रसिद्ध आहे, हे तलाव वैश्विक समुद्राचे प्रतिनिधित्व करत असल्याची माहिती दिली जाते. मंदिरात जी भगवान विष्णू यांची मूर्ती आहे ती खूप रेखीव आहे, प्रत्येक वेळी नव्याने मनात ठसली जाते. या मूर्तीची सुंदरता डोळ्यांना क्षणात भावते म्हणून तर अनेक लोक या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दुरून येतात.

भगवान विष्णूची मूर्ती खूप छान बनवली आहे, या मूर्तीचे रेखाटन खूपच रेखीव वाटते. ही तलावातील विष्णूची मूर्ती शेषनागाच्या कुंडात विराजमान झालेली आपणास पाहायला मिळते, तसेच या मूर्तीमध्ये भगवान विष्णूचे पाय ओलांडले गेले आहेत. तसेच या प्रतिमेत भगवान विष्णू यांचे चार हात आहेत, जे वेगवेगळे दैवी गुण दाखवतात.

यांमध्ये एका हातात मनाचे प्रतिनिधित्व करणारे पहिले चक्र , तसेच चार घटकांचे प्रतिनिधित्व करणारे शंख शेल, चालणारे विश्व दर्शवणारे कमळाचे फुल, तसेच प्रबळ ज्ञानाचे प्रतिनिधित्व करणारी गदा दिसून येते. या चार गोष्टी पाहून मन प्रसन्न होऊन जाते, विष्णुवरची श्रद्धा वाढत राहते.

तसेच या मूर्तीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, ही भगवान विष्णूची मूर्ती शेषनागाच्या कुंडात स्थित असलेली आपण पाहतो पण आश्चर्य म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णूची मूर्ती असून पाण्यात पाहिले असता भगवान शंकर दिसून येतात. शिवशंकरांची अशी अप्रत्यक्षपणे मूर्ती पाहिल्यावर कोणीही थक्क होऊन जाईल.

येथील भाविकांचे म्हणणे आहे की शिवमहोत्सवाच्या वेळेस तलावाच्या पाण्याखाली प्रत्यक्ष भगवान शिव आपल्याला दर्शन देतात. तसेच येथील भाविक या मंदिराला खूप मानतात, आपण पौराणिक कथा पाहिली तर कळते की जेव्हा समुद्रमंथन सुरू होते आणि विष समुद्रातून बाहेर येण्याची वेळ आली तेव्हा सृष्टीला वाचवण्यासाठी भगवान शंकर यांनी सर्व विष स्वतः घेतले होते. त्यांनी ते विष ग्रहण केल्यामुळे त्यांना नीलकंठ म्हटले जाते.

सर्व विष ग्रहण केल्यावर जेव्हा भगवान शिव यांचा घसा जळत होता, जेव्हा त्यांना त्रास होऊ लागला होता तेव्हा त्यांनी काठमांडूच्या उत्तर सीमेवर जाऊन डोंगरावर त्रिशूल मारले जेणेकरून तिथे एक तलाव तयार होईल. तीथे त्यांनी तलावाची स्थापना केली आणि तसेच आपली तहान देखील भागवली होती. हे तलाव गोसाईकुंड म्हणून देखील ओळखले जाते, या तलावाची अनेक वैशिष्ट्य आहेत.

हे तलाव मंदिराची शोभा वाढवते, या मंदिरामुळे अनेक कथा आपल्याला माहिती होतात. नेपाळ मधील काठमांडू येथील शिवपुरी मध्ये हे मंदिर स्थित असून अनेक भाविक नेहमी दर्शनासाठी येतात. तर मित्रहो कधी संधी मिळाली तर तुम्हीही या मंदिराला एक भेट नक्की द्या. तसेच आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.

You might also like