एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

विराट कोहली कर्णधारपद सोडणार? कोण आहे टीम इंडियाचा पुढील कॅप्टन! जो धोनी नंतर सांभाळू शकेल टीम इंडियाला..

टीम इंडियामध्ये लवकरच एक मोठा बदल होणार आहे. टी -२० वर्ल्डकपनंतर विराट कोहली कर्णधारपद सोडणार असल्याची बातमी समोर आली आहे. मर्यादित ओव्हर स्वरूपाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवले जाऊ शकते. तर कसोटी क्रिकेटमध्ये कोहली कर्णधारपदावर कायम राहतील असे म्हटले जात आहे.

परंतु काही महिन्यांपूर्वी विराट कोहलीने रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाशी कर्णधारपदाबाबत बोलणी केली होती. जेव्हा भारताने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकली तेव्हाच कर्णधार विराट कोहली बाबा झाला होता.

“विराट कोहली म्हणाले की मी यापुढे आपल्या खेळीवर पूर्ण लक्ष्य देणार आहे, मी परत जाऊन तेच बनेन जे मी आधी होतो टीम इंडियाचा बेस्ट बॅट्समन ” या बातमीनंतर माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. रोहित शर्माला कर्णधार बनवण्याची बातमी येण्याची ही पहिली वेळ नाही.

यापूर्वीही अनेक वेळा चाहते आणि अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी रोहितला कर्णधार बनवण्याची मागणी केली आहे. पण कोहलीला स्वतः कर्णधारपद सोडायचे असेल तरच विभाजित कर्णधारपद शक्य आहे असे म्हंटले जाते.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सध्यातरी संघ उत्तम कामगिरी करत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कोहली भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कर्णधार बनला आहे. मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्येही भारत टॉप -३ संघांमध्ये आहे. कोहलीच्या कर्णधारपदाची एकमेव अडचण म्हणजे त्याच्या हातात आयसीसी ट्रॉफी आलेली नाही. आणि कदाचित एक चांगला कर्णधार होण्याचा एकमेव उपाय म्हणजे आयसीसी ट्रॉफी होय.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आत्तापर्यंत ७०.४३ टक्के सामने जिंकले आहेत. विराटने ९५ एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपद बजावले आहे. ज्यात टीम इंडियाने ६५ सामने जिंकले आणि २७ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचबरोबर कोहलीने ४५ टी -२० सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले होते, ज्यात टीम इंडियाने २७ सामने जिंकले आणि १४ गमावले. तर २ सामने अनिर्णित राहिले होते.

विराट सध्या आपल्या बॅटिंगवर ध्यान देऊ असे म्हणत आहेत यावरून असं दिसतं आहे की कर्णधारपद पुन्हा रोहित शर्मा यांच्याकडे जाईल पण तुम्हाला यावर काय वाटत की कोण भारताचा सर्वोत्तम कर्णधार होऊ शकतो. जो टीम इंडियाला उत्तर हँडल करू शकेल आत्ता लवकरच नवा कॅप्टन कोण असेल याचा उलघडा होईल.

You might also like