एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

विना मेकअप अशा दिसतात तुमच्या आवडत्या या अभिनेत्री, ३ नंबरचीला ओळखू हि शकणार नाही..

मुली आणि मेकअप यांचं जन्मोजन्मीचं नातं आहे. जरी त्यांची यावरून कधी कधी खिल्ली उडवली जात असली तरी मुलींचे सौंदर्य मेकअपमुळे खुलून येतं ही बाब कुणीच नाकारू शकत नाही. अभिनयाचे क्षेत्र हे एक असे क्षेत्र आहे जिथे अभिनेत्री मेकअप शिवाय राहूच शकत नाहीत. या अभिनेत्रींना नेहमी कॅमेऱ्यासमोर रहावं लागतं. त्यामुळे आपण त्यांना नेहमी मेकअप मध्येच पाहतो.

एक काळ असा होता की मेकअप शिवाय अभिनेत्रीला बघताच येत नसे. अभिनेत्रींना देखील मेकअप शिवाय आपला चेहरा दाखवणे फारसे आवडत नसे. लोकांना अभिनेत्रींना मेकअप शिवाय बघायची सवय देखील नव्हती.

आता मात्र काळ बदलला आहे. बऱ्याच अभिनेत्री आजकाल सोशल मीडिया वर आपला मेकअप शिवाय चा ‘नो मेकअप लूक’ फोटो शेअर करताना दिसतात. काही अभिनेत्रींनी विना मेकअप चित्रपटांमध्येही कामे केली आहेत. अशाच काही अभिनेत्रींचे विना मेकअप फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

१. सारा अली खान
सध्या तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनलेली अभिनेत्री म्हणजे सारा अली खान. तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. मुंबई च्या विमानतळावर तिचा हा विना मेकअप लूक टिपण्यात आला होता.

२. कतरीना कैफ
बाहुलीसारखी दिसणारी अभिनेत्री कतरीना कैफ करोडो दिलों की धडकन आहे. तिच्या सौंदर्यावर तिचे चाहते फिदा आहेत. ही अभिनेत्री जिम मध्ये जाताना अजिबात मेकअप करत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेकअप शिवाय देखील ही अभिनेत्री खूपच गोड दिसते.

३. सोनम कपूर
बॉलिवूड मध्ये फॅशन डिवा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे अभिनेता अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर. चित्रपटांपेक्षा आपल्या ड्रेसिंग आणि फॅशन सेन्स मुळे प्रसिद्धी मिळालेल्या सोनम ने सोशल मीडिया वर आपला विना मेकअप फोटो पोस्ट केला आहे.

४. काजल अगरवाल
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारी गोड अभिनेत्री म्हणजे काजल अगरवाल. हिंदी मध्ये ‘सिंघम’ चित्रपटात काम केल्यानंतर तिला खूप प्रसिद्धी मिळाली. काजलनेही आपले विना मेकअप फोटो सोशल मीडिया वर शेअर केले आहेत.

५. सुश्मिता सेन
या विश्वसुंदरीला पाहून कोणाच्या हृदयाचे ठोके वाढणार नाहीत! वयाच्या ४४ व्या वर्षी तिचे २८ वर्षीय प्रियकराबरोबर असलेले संबंध हा लोकांच्या चर्चेचा विषय आहे. तिचा हा विना मेकअप लूक दाखवून देतो, की अभिजात सौंदर्याला वय आणि मेकअप च्या मर्यादा नसतात.

तुम्हाला या अभिनेत्रींपैकी कोणाचा विना मेकअप लूक आवडला, ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा.

You might also like