एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘ती परत आलीये’ मधील या अभिनेत्याच्या पत्नीबद्दल ‘ही’ गोष्ट तुम्हाला माहीत का?

झी मराठी वाहिनी वर सध्या ‘ती परत आलीये’ मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे. आपल्या रहस्यमयी थराराने या मालिकेने सुरुवातीलाच सगळ्यांची घाबरगुंडी उडवलेली आहे. प्रेक्षक या मालिकेला खूप पसंती देताना दिसत आहेत. या मालिकेच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांनी बऱ्याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत.

या दिग्गज अभिनेत्याने आपल्या विनोदाने लोकांना खळखळून हसवलं आहे. इरसाल कार्टी (१९८७), तेरे मेरे सपने (१९९६), चष्मेबहाद्दर (२००६), चालू द्या तुमचं (२०१७), श्यामची शाळा (२०१७), मंकी बात (२०१८), ऍट्रॉसिटी (२०१८), एक ती (२०२१), टोपी घाला रे, बच्चे सबसे अच्छे, देखणी बायको नाम्याची, मधुचंद्राची रात्र, तोचि एक समर्थ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम करत त्यांनी आपला असा वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे.

‘हळद रुसली कुंकू हसलं’ या चित्रपटात त्यांनी अभिनेत्री अश्विनी भावे यांच्या नवऱ्याची भूमिका निभावली होती. टूर टूर, सही दे सही, पप्पा सांगा कुणाचे यांसारख्या नाटकांमध्येही त्यांनी कामे केली आहेत.

मंडळी, तुम्हाला माहीत आहे का, की या दिग्गज अभिनेत्याची पत्नीदेखील एक अभिनेत्री आहे? होय, विजय कदम यांच्या पत्नी देखील अभिनय क्षेत्रात आहेत. विजय कदम यांच्या पत्नीचे नाव पद्मश्री जोशी आहे. या दोघांचा हा प्रेमविवाह आहे. विजय एकदम आणि पद्मश्री जोशी यांनी अनेक नाटकांमध्ये एकत्र कामे केली आहेत.

गंमत म्हणजे, विजय कदम यांनी पद्मश्री यांना दोनदा प्रपोज करूनही त्यांनी नकार दिला होता. मात्र पद्मश्री यांनी त्यांचे ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकातले काम पाहिले. विजय कदम यांनी साकारलेल्या भूमिकेमुळे त्या प्रभावित झाल्या आणि विजय कदम यांच्या प्रेमात पडल्या. त्यांनी आपला होकार कळवला.

पद्मश्री जोशी यांनी नणंद भावजय, पोरीची धमाल बापाची कमाल, नवलकथा या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या त्या चित्रपटांमध्ये काम करत नाहीत. काही दिवसांपूर्वीच त्या विजय कदम यांच्याबरोबर ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात येऊन गेल्या.

बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीत नाही, की पद्मश्री जोशी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. या दोघींना एक भाऊ देखील आहे. अलंकार जोशी असे त्याचे नाव असून ७० आणि ८० च्या दशकात ‘मास्टर अलंकार’ म्हणून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकाराच्या भूमिका निभावल्या आहेत.

You might also like