एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अलार्म काकांची अचानक एक्झिट! ‘उठा उठा दिवाळी आली…’ जाहिरातीतील अलार्म काका गेले..

दिवाळी म्हटलं की मोती साबण आलाच आणि मोती साबण म्हटली की मोती साबणाची जाहिरात देखील आली. या जाहिरातीत एक आजोबा दिवाळीच्या दिवशी मोती साबणाने सगळ्यांची दारं वाजवत ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली’ असं म्हणत उठवत असतात. त्यामुळे सोसायटीत त्यांना सगळे ‘अलार्म काका’ म्हणून ओळखत असतात. आज याच अलार्म काकांनी अचानक एक्झिट घेत सगळ्यांना ध’क्का दिला आहे. या जाहिरातीतील आजोबांची भूमिका ज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांनी साकारली होती.

actor Vidyadhar Karmarkar

काल २० सप्टेंबर २०२१ रोजी विद्याधर करमरकर यांनी जगाचा निरोप घेतला. ते ९६ वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांनी ही दुःखद बातमी ऐकून खंत व्यक्त केली आहे. विद्याधर करमरकर यांनी आजपर्यंत अनेक हिंदी चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केलं आहे. नव्वदी ओलांडलेल्या या तरुणाला सगळे ‘आबा’ म्हणून ओळखत.

विद्याधर करमरकर मुंबईतील विलेपार्ले येथे राहायला होते. पहिल्यापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळे आपली नोकरी सांभाळत त्यांनी आपली अभिनयाची आवडही जोपासली होती. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ते खूप उत्साहाने सहभागी व्हायचे. त्यांनी अशा कार्यक्रमांमधून अनेक नाटकांचे सादरीकरण केले आहे. कधी कधी त्यांनी अशा नाटकांसाठी दिग्दर्शनाची धुरा देखील सांभाळली होती.

त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमधून कधी वडिलांच्या तर कधी आजोबांच्या भूमिका साकारल्या आहेत. कार्तिक कॉलिंग कार्तिक, सास बहू और सेन्सेक्स, एक थी डायन, एक व्हिलन, दोस्ती यारिया मनमर्जीया, गेम विथ अनुपम खेर, लंच बॉक्स अशा अनेक हिंदी चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. बऱ्याच जाहिरातींमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे. मोती साबण, इंडियन ऑइल, लिनोवो कॉम्प्युटर्स, एशियन पेंट्स, हेन्झ टोमॅटो केचअप यांसारख्या जाहिरातींमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.

या वयातही त्यांचा उत्साह अगदी एखाद्या तरुणाला लाजवेल असा होता. एकदा एका चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी ते आजारी पडले. मात्र आपले आजारपण कामाच्या आड येऊ न देता त्यांनी आपले काम चोख पार पाडले. आपल्या कामाप्रती त्यांना किती आस्था होती. हेच यातून दिसून येते. उत्साही अशा या अलार्म काकांना सगळेच प्रेक्षक आता मिस करणार आहेत. अशा या उत्साही तरुणाला आमच्या टीम तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!

You might also like