एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

व्हिक्स च्या जाहिरातीतील ही मुलगी आज आहे प्रसिद्ध व्यक्ती! ‘ऐका दाजिबा’ गाण्यात दिसला होता हा चेहरा..

पूर्वीच्या काळी खूप कमी वाहिन्या होत्या. त्यामुळे त्या वाहिन्यांवर लागणाऱ्या मालिका अजूनही लोकांच्या लक्षात आहेत. एवढेच नाही, तर या वाहिन्यांवर लागणाऱ्या जाहिराती आणि त्या जाहिरातीतील चेहरे देखील लोकांच्या लक्षात आहेत.

अशीच एक लक्षात राहिलेली जाहिरात म्हणजे १९८२ साली दूरदर्शन वर प्रदर्शित झालेली ‘व्हिक्स कफ ड्रॉप्स’ ची. या जाहिरातीतील लक्षात राहिलेला चेहरा म्हणजे यातल्या चिमुरडीचा. कोण आहे बरं ही चिमुरडी?

वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी ‘व्हिक्स कफ ड्रॉप्स’ ची जाहिरात करणाऱ्या या चिमुरडीचे नाव आहे इशिता अरुण. शाळेत शिकत असतानाच या चिमुरडीने नादिरा बब्बर यांच्या ऍक्टिंग वर्कशॉप मधून अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. सेंट झेवियर्स कॉलेज मधून तिने आपले पुढचे शिक्षण पूर्ण केले. श्याम बेनेगल यांच्या ‘यात्रा’ या मालिकेत तिला पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळाली.

इशिता अरुण ही अभिनेत्री आणि गायिका इला अरुण यांची मुलगी आहे. इशिता अरुण अजून एका गोष्टीमुळे प्रसिद्धी झोतात आली. २००२ मध्ये गायिका वैशाली सामंत चे ‘ऐका दाजिबा’ हे गाणे खूप हिट ठरले.

या गाण्याच्या व्हिडिओ मध्ये अभिनेता मिलिंद गुणाजी आणि इशिता अरुण झळकले होते. या गाण्यामुळे इशिता बरीच चर्चेत आली होती. या गाण्याच्या प्रसिद्धीमुळे इशिताला सोनू निगमच्या ‘मौसम’ या अल्बम मध्ये काम करण्याची संधी मिळाली.

इशिता अरुण अभिनयाबरोबरच गाणे देखील गाते. ‘सारेगमप- एक मैं और एक तू’ या गाण्याच्या रिऍलिटी शो चे तिने सूत्रसंचालनही केले आहे. यामध्ये तिच्याबरोबर गायक शान देखील सूत्रसंचालकाच्या भूमिकेत होता.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by bodhisattvaish (@iamishittaarun)

इशिता अरुण ने २००५ मध्ये ध्रुव घाणेकर या शास्त्रीय आणि जॅझ गायकाबरोबर लग्न केले. ध्रुव घाणेकर हा दिग्दर्शक गिरीश घाणेकरांच्या मुलगा आहे. ध्रुवला गिटार वाजवण्याचा छंद आहे. तो अनेक स्टेज शोज् करतो.

पूर्वीच्या काळी खूप कमी जाहिराती लागत. त्यामुळे त्या कंटाळवाण्या न वाटता मालिकेचाच एक भाग होऊन जायच्या. मालिका जितक्या लोकांच्या लक्षात रहात, तेवढ्याच जाहिराती देखील लोकप्रिय होत असत. या जाहिरातीतले प्रॉडक्ट्स, त्यात काम करणारे चेहरे या सर्वांचंच अप्रूप होतं. हे चेहरे नंतर काय करतात, याबद्दलही लोकांना उत्सुकता असते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by bodhisattvaish (@iamishittaarun)

मित्रहो, आज यातल्याच एका चेहऱ्याबद्दल म्हणजे इशिता अरुण बद्दल आपण जाणून घेतलं. आमच्या आगामी लेखांमध्ये आम्ही नक्कीच तुम्हाला अशा चेहऱ्यांची भेट घडवत राहू. त्यासाठी आमचे लेख नियमितपणे वाचत चला. आमचे लेख आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.

You might also like