एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘सैराट’ मधील परश्याच्या आईला ओळखलंत का? या चित्रपटात केले होते काम..

मराठी चित्रपटसृष्टीत दरवर्षी अनेक चित्रपट तयार होत असतात. काही चित्रपट इतिहास घडवतात. अशा चित्रपटांच्या नावाने एखादे वर्ष ओळखले जाते. तसेच काहीसे झाले २०१६ मध्ये. २०१६ हे वर्ष कोणीच विसरू शकणार नाही. कारण या वर्षाच्या एप्रिल महिन्यात एका असा चित्रपट प्रदर्शित झाला ज्याने मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहासच बदलून टाकला. मराठीला बॉलिवूड सारखे ‘१०० करोड क्लब’ चे स्वप्न दाखवले. हा चित्रपट आहे ‘सैराट’.

नागराज मंजुळे यांच्या अभिजात दिग्दर्शनाने नटलेला हा चित्रपट अनेक गोष्टींसाठी उदाहरण बनून गेला. केवळ ४ कोटी रुपयांत बनलेल्या या चित्रपटाने जवळपास ११० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. मराठी चित्रपटसृष्टीतला हा आजपर्यंतचा सर्वांत जास्त कमाई करणारा चित्रपट आहे. अर्थात ही सगळी जादू होती नागराज मंजुळे या दिग्दर्शकाची ज्याने या चित्रपटाचे खूप सुंदर दिग्दर्शन तर केलेच, पण आपल्या या चित्रपटात काम करण्यासाठी त्याने असे हिरे निवडले जे सगळ्यांना आवडतील.

खरंतर या चित्रपटात काम केलेले अनेक कलाकार हे नवखे आहेत. पण नागराज मंजुळे यांनी या सगळ्या कलाकारांना पद्धतशीर प्रशिक्षण दिले. त्यामुळे या कलाकारांमधील अभिनय गुणांना वाव मिळाला. चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारे आर्ची आणि परश्या म्हणजेच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या दोघांचा अभिनय तर दृष्ट लागण्याजोगा होता. यांना बाकी कलाकारांनी दिलेली उत्तम साथ या चित्रपटाला पुढे नेण्यात मोलाची ठरली.

या कलाकारांमध्ये एक कलाकार होती वैभवी परदेशी. परश्याच्या आईची भूमिका तिने ‘सैराट’ चित्रपटात साकारली होती. खरंतर हा काही तिचा पहिला चित्रपट नव्हता. पण तिने या चित्रपटात खूप सुरेख अभिनय केला आहे. ‘सैराट’ मध्ये काम करण्याआधी वैभवीने ‘कम्पलसरी हेल-मेट’ (२००६) या शॉर्ट फिल्म मध्ये एक भूमिका साकारली होती.

‘सैराट’ ने तिला खरी प्रसिद्धी मिळवून दिली. या चित्रपटामुळे तिच्या कलागुणांना वाव मिळाला. ‘सैराट’ चित्रपटाने तिला अजून एक चित्रपट मिळवून दिला. २०१९ मध्ये तिला ‘फायरब्रँड’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

वैभवीचा जन्म २७ मार्च १९८६ रोजी झाला आहे. वैभवी पुण्यात राहते. वैभवी परदेशीने पुण्याच्या ललित कला केंद्रातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. वैभवीच्या कलागुणांना असाच वाव मिळत राहील यात शंकाच नाही. तिला अनेक उत्तम चित्रपटात काम करण्याची संधी मिळत राहो यासाठी शुभेच्छा!

You might also like