एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘बिग बॉस मराठी ३’ मधील स्पर्धक उत्कर्षची शिंदेची ही आहे बायको! जाणून घ्या या गोष्टी…

कलर्स मराठी वाहिनी वरील ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ सध्या चांगलाच गाजतोय. यातल्या स्पर्धकांनी प्रेक्षकांची जराही निराशा न करता त्यांचे सतत मनोरंजन सुरू ठेवले आहे. उत्कंठावर्धक टास्क, एकमेकांबरोबरचे बॉन्डींग, या बरोबरच बिग बॉसच्या घरातील भांडणं देखील बरीच गाजतात. कधी कधी तर काही प्रेमप्रकरणं पण उदयाला येतात. यातली अजून एक उत्कंठवर्धक गोष्ट म्हणजे बिग बॉसच्या घरातील कॅप्टनसी.

‘बिग बॉस मराठी’ च्या तिसऱ्या पर्वाचा पहिला कॅप्टन होण्याचा मान मिळाला तो स्पर्धक उत्कर्ष शिंदेला. ‘बिग बॉसच्या चावडी’ वर जरी त्याला त्याच्या कॅप्टनसी बद्दल महेश मांजरेकर यांनी फटकारले असले, तरी तो खूप चांगला स्पर्धक आहे हे बऱ्याच जणांनी कबूल केले होते. उत्कर्षला उभा महाराष्ट्र एक उत्तम गायक म्हणून ओळखतो. हाक मारतंय कोल्हापूर, गो क’रोना क’रोना गो, को’वि’ड योद्धा म्हणा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, हळदीचा सोहळा ही त्याची काही गायक म्हणून गाजलेली गाणी. काही चित्रपटांसाठीही त्याने गाणी गायली आहेत.

उत्कर्ष गीतकारही आहे. स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेच्या शीर्षकगीताची रचना उत्कर्षने आपला भाऊ आदर्श शिंदे बरोबर मिळून केली होती. भीमगीते आणि लोकगीतांसाठी उत्कर्ष शिंदे प्रसिद्ध आहे. ‘शिंदेशाहीची भीमशाही’ या कार्यक्रमाची संकल्पना देखील उत्कर्षचीच होती. इतर ३० कलाकारांसह हा कार्यक्रम महाराष्ट्रभर सुरू असतो.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr Utkarsh Anand Shinde (@utkarshshindeofficial)

उत्कर्ष शिंदेने काही मालिकांसाठी संगीतकार म्हणूनही काम केले आहे. पॉवर, नंदू नटवरे, फुंकर, संगीत खुर्ची, गौरव महाराष्ट्राचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, बाजीरावांचा पोवाडा, आवाज महाराष्ट्राचा यांसारख्या चित्रपट आणि मालिकांसाठी उत्कर्षने संगीतरचना केली आहे.

उत्कर्षचा जन्म ११ जानेवारी १९८६ रोजी झाला. एक उत्तम गायक, गीतकार आणि संगीतकार असण्याबरोबरच उत्कर्ष एक डॉक्टर देखील आहे. त्याने लंडन आणि अमेरिकेतून आपले डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. उत्कर्षचे लग्न झाले असून त्याच्या बायकोचे नाव स्वप्नजा आहे. स्वप्नजा देखील पेशाने डॉक्टर आहे. ५ वर्षांपूर्वी उत्कर्ष आणि स्वप्नजाचे मुंबईमध्ये थाटामाटात लग्न लावून देण्यात आले होते.

मित्रांनो, तुम्हाला उत्कर्ष एक गायक म्हणून कसा वाटतो? तसेच त्याचा बिग बॉसच्या घरातील गेम तुम्हाला आवडतो का? त्याने बिग बॉसच्या घरात राहावे असे तुम्हाला वाटते का? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा.

You might also like