एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘उंच माझा झोका’ मधील ही चिमुरडी आठवते का? आता दिसते अशी…

झी मराठी वाहिनी वर २०१२ साली ‘उंच माझा झोका’ ही मालिका सुरू झाली. वयाच्या ११ व्या वर्षी यमुना नावाच्या मुलीचं महादेव गोविंद रानडे या व्यक्तीशी लग्न होतं आणि तिचं सगळं जगच बदलून जातं. या यमुनेची पुढे ‘रमाबाई रानडे’ होते आणि इतिहासाला गर्वाने मिरवता यावं असं अजून एक व्यक्तिमत्व मिळतं.

स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या रमाबाई रानडे यांची जीवनगाथा ‘उंच माझा झोका’ या मालिकेद्वारे मांडण्यात आली होती. या मालिकेत यमुनेची अर्थात छोट्या रमाबाईंची भूमिका साकारली होती बालकलाकार तेजश्री वालावलकर ने.

या मालिकेतील भूमिकेमुळे तेजश्री लोकप्रिय झाली. अल्लड पण समंजस अशी यमुना उर्फ रमाबाई तिने खूप छान साकारल्या होत्या. अर्थात या मालिकेनंतर प्रेक्षकांनी तिला फारशी पडद्यावर पाहिली नाहीये. त्यामुळे ती सध्या काय करते असा प्रश्न तमाम प्रेक्षकांना पडला असणं साहजिक आहे.

तर मंडळी, ही छोटी तेजश्री आता खूप मोठी झाली आहे. तेजश्रीला पहिल्यापासून लिखाणाची आवड आहे. तिने दोन बालनाट्ये देखील लिहिली आहेत. भालबा केळकर प्रतिष्ठानतर्फे ही बालनाट्ये सादर करण्यात आली होती.

विशेष म्हणजे या दोन नाटकांचे दिग्दर्शनही तेजश्रीनेच केले होते. ‘हो, मला जमेल’ आणि ‘दहीहंडी’ ही ती दोन नाटके आहेत. तेजश्रीने या नाटकांमध्ये भूमिकाही केल्या होत्या. तिच्या बाकी कामांबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अस्मिता चित्रच्या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याबरोबर काम केले होते.

२०१० मध्ये तिने ‘आजी आणि नात’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात सुलभ देशपांडे यांनी आजीची भूमिका साकारली होती. २०१० मध्ये तिला शाहू मोडक प्रतिष्ठानतर्फे पुरस्कारही मिळाला होता. ‘रुणुझुणू’ मालिकेच्या काही भागांमध्येही तिने काम केले होते.

‘उंच माझा झोका’ मध्ये भूमिका करण्याची संधी कशी मिळाली, हे सांगताना ती म्हणाली, “या भूमिकेसाठी ऑडीशन सुरू झाल्यावर आई मला तिकडे घेऊन गेली. तिथे माझी स्क्रीन टेस्ट झाली. ऑडीशन झाली. दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान यांनी माझी निवड केली.”

पुढे तिने सांगितले, “माझ्या पणजीचे नावही रमाबाई होते आणि माझे पणजोबा सेवासदनमध्ये मुख्याध्यापक होते. हा एक योगायोग आहे. ही भूमिका करताना मला जुन्या काळातील खूप गोष्टी, सवयी शिकाव्या लागल्या. मुख्य म्हणजे भाषा. पण आता ती सवयीची झाली आहे.”

You might also like