एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

या गावात आहेत २०० पेक्षा जास्त जुळी मुलं, अजूनही वाढत आहे संख्या! वैज्ञानिक म्हणतात की एकच व्यक्ती करते…

खूपदा तुम्ही टीव्हीवर जुडवा चित्रपट पाहिले असेल ज्यात एक सारखी दिसणारी २ किव्हा ३ मुलं असतात पण त्यांचे आईवडील त्यांना कसे आणि कोणत्या नावाने ओळखत असतील याचे रहस्य काही समजत नाही पण खऱ्या आयुष्यात जर असे काही झाले तर काय होईल तुम्हाला ऐकून हैरानी होईल की आम्हाला एक असे गाव सापडले आहे ज्यात २०० हुन अधिक जुळी मुलं आहेत.

एकदा का ही घरची मुलं बाहेर सुटली की बाहेरच्या लोकांना त्यांना ओळखता येत नाही. आता कल्पना करा २०० पेक्षा जास्त जुळी मुले तुमच्या समोर आली तर कसे होईल? होय, आम्ही भारतातील एका गावाबद्दल बोलत आहोत, जिथे अनेक जुळी मुले जन्माला आली आहेत आणि आजही त्यांची संख्या सतत वाढत आहे. केरळच्या कोडिन्ही गावात, प्रति १००० मुलांमागे सुमारे ४२ जुळी मुले जन्माला येत असतात. ग्लोबल रेशोबद्दल बोलायचे झाले तर ते प्रति एक हजार मध्ये सहा आहेत.

image:World Bhraman

म्हणजेच, कोडिन्ही या गावात जुळ्यांचा जन्म जगाच्या तुलनेत ७ पट अधिक आहे. कोचीपासून सुमारे १५० किमी अंतरावर असलेल्या या गावात फक्त २००० लोक राहतात, त्यापैकी ४०० जुळी मुलंच आहेत. इतके जुळे एकत्र असणे खरोखर आश्चर्यकारक आहे, हे अनोखे रहस्य जाणून घेण्यासाठी, भारत, जर्मनी आणि ब्रिटनमधील संशोधकांची एक टीम येथे पोहोचली होती, त्यांनी गावातील लोकांच्या थुंकीचे नमुने घेतले. गावातील लोकांची उंची, कातडी इत्यादींवर संशोधन केले, पण आजपर्यंत कोणताही निष्कर्ष समोर आलेला नाही.

image: Deccan Chronicle

याशिवाय, यूपीमध्ये प्रयागराजजवळ एक जागा आहे, जिथे इतर मुलांपेक्षा जास्त जुळे जन्माला येतात. हैदराबाद, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, मुंबई इत्यादी शास्त्रज्ञ आणि तज्ञ तेथे पोहचले होते परंतु त्यापैकी कोणीही कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचू शकले नाही. गावात सुमारे २५० कुटुंबे राहतात, परंतु येथेही गेल्या पाच दशकांमध्ये १०० पेक्षा जास्त जुळे जन्माला आले आहेत. कोडिन्हिबद्दल बोलताना, स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की येथे जुळ्या मुलांच्या जन्माची प्रक्रिया ७० वर्षांपूर्वी सुरू झाली होती.

या विषयावर सध्या संशोधन करणारे डॉ. कृष्णन सिरीबीजू म्हणतात की, “हे गाव वैद्यकीय जगतात एक चमत्कार आहे. मला वाटते की हे इथल्या लोकांचा हा डाईट आहे, ते म्हणाले की ६०- ७० वर्षांपूर्वी येथे लग्न १८ ते २० वयात होऊन जायचे. हे कुटुंब लवकर सुरू होण्याचे एक कारण असू शकते, कोडिन्हिच्या या गावाच्या चमत्कारामुळे त्याला जुळ्यांचे गाव म्हटले जाते.

You might also like