एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मधली अभिनेत्री नक्की आहे तरी कोण?

झी मराठी सध्या अनेक नव्या मालिका घेऊन येत आहे. आधीच्या रटाळ मालिकांना कंटाळलेले प्रेक्षक किमान या नवीन मालिकांमुळे तरी परत झी मराठी वाहिनी कडे परत येतील अशी अपेक्षा आहे.

नव्या मालिकांचे प्रोमो रिलीज झाले आहेत. हे प्रोमो प्रेक्षकांना पुन्हा आपल्याकडे आकर्षित करून घेण्यात यशस्वी झाले आहेत. या नव्या मालिकांच्या मांदियाळीत सध्या एक नाव चर्चेत आहे ते ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेचे. या मालिकेत दिसणारा चेहरा सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

कोण आहे हा नवीन चेहरा? हा चेहरा आहे अभिनेत्री अमृता पवारचा. छोट्या पडद्याच्या प्रेक्षकांना हा चेहरा नवीन नक्कीच नाही. झी मराठी वर अमृता पहिल्यांदा पदार्पण करत आहे. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेच्या प्रोमो मध्ये आपण तिला पाहू शकतो.

आपल्याला या प्रोमो मध्ये ती काही नावे पाठ करताना दिसत आहे. तिला कुणीतरी येऊन विचारतं की ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे का. पण यावर ती नाही म्हणत सांगते की ती संसाराची तयारी करत आहे. संसार करताना एका जोडप्याला काय काय अडचणी येतात, हे या मालिकेतून दाखवण्यात येणार आहे.

अमृताने आपले अभिनयातील पदार्पण ‘दुहेरी’ या मालिकेद्वारे केले. ही मालिका २०१६ ते २०१८ च्या दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारीत होत होती. त्यानंतर तिला त्याच वाहिनी वरील ‘ललित २०५’ (२०१८) या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amruta Pawar (@pawaramruta)

या मालिकेत ती संग्राम समेळ या अभिनेत्याबरोबर दिसली होती. ‘स्वराज्य जननी जिजामाता’ (२०१९) या सोनी मराठी वाहिनी वर प्रसारित होणाऱ्या मालिकेत अमृताने तरुणपणीच्या जिजामातांची भूमिका साकारली होती.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amruta Pawar (@pawaramruta)

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका झी मराठी वाहिनी वर येत्या ३० ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे. सध्या या वेळी ‘माझा होशील ना’ ही मालिका सुरू आहे.

अजून ‘माझा होशील ना’ मालिकेच्या शेवटचे संकेत वाहिनीने दिले नसले तरी नव्या मालिकेमुळे ही मालिका संपणार, असा अंदाज प्रेक्षक बांधत आहेत. काही दिवसांत आपल्याला कळेलच की ‘माझा होशील ना’ मालिका संपणार आहे की त्याची वेळ बदलून ती दुसऱ्या वेळेत प्रसारीत होणार आहे.

You might also like