एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

तुषार कपूरच्या शर्टलेस फोटो वरून ट्रो’लिं’ग सुरू! मिळाला हमदर्दचे टॉनिक घेण्याचा सल्ला..

रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल’ चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. या मालिकेतील बाकी चित्रपटांनीही प्रेक्षकांचे तितकेच मनोरंजन केले आहे. यातील प्रत्येक पात्राचे आपले असे वेगळेपण होते. तुषार कपूरच्या मुक्या पात्राने तर धमाल उडवून दिली होती. तुषारचे चित्रपट फारसे चालले नसले तरी ‘गोलमाल’ चित्रपटाने त्याला बरीच ओळख मिळवून दिली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tusshar Kapoor (@tusshark89)

तुषार सोशल मीडिया वर बराच सक्रीय असतो. सध्या त्याने अपलोड केलेला फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. तुषारने आपले दोन शर्टलेस सेल्फी शेअर केले आहेत. यावर त्याने कोणतेही कॅप्शन टाकले नाहीये. त्याची थोडी वाढलेली पांढरी दाढी त्याचे वय जाणवून देत आहे. यावरून नेटकऱ्यांनी त्याला ट्रो’ल करायला सुरुवात केली आहे. अभिनेत्री सेलिना जेटलीने तर त्याला चक्क एक सल्ला दिला आहे.

सेलिना आपल्या कमेंट मध्ये म्हणते, ‘हमदर्दचे टॉनिक सुरू करणं हा एक चांगला पर्याय असू शकतो.’ हमदर्दचे टॉनिक हे शक्तिवर्धक म्हणून वापरले जाते. अनेक नेटकऱ्यांनी ‘गोलमाल’ चित्रपटाचा संदर्भ घेत ‘तुम्ही म्हातारे झालात रामू काका’ असेही म्हटले आहे. एका नेटकऱ्याने तर चक्क तुला कोणतेच प्रोजेक्ट्स मिळणार नाहीत असेही म्हटले आहे. या नेटकाऱ्याने म्हटले आहे, की ‘सर, आपली अवस्था बघा जरा.

असे सेल्फी शेअर कराल तर रोहित शेट्टी देखील तुम्हाला चित्रपटात घेणार नाही.’ काही नेटकऱ्यांनी तर फारच गमतीशीर कमेंट्स केल्या आहेत. ‘भाऊ, जर तू दाढी वाढवायचा विचार करत असलास, तर असला विचार सोडून दे. नेमकी तू दाढी वाढवशील आणि नेमकं त्यावेळी पाणी गेलं तर तुला दाढी करणं अवघड होईल,’ असं एका नेटकऱ्याने म्हटले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tusshar Kapoor (@tusshark89)

तुषार कपूरने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुझे कुछ कहना है’ चित्रपटाद्वारे केली होती. या चित्रपटासाठी त्याला उत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला होता. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री करीना कपूर देखील होती. त्यानंतर तुषार कपूरने ‘क्या दिल ने कहा’, ‘ये दिल’, ‘कुछ तो है’, ‘जीना सिर्फ मेरे लिए’ असे चित्रपट केले. मात्र ते फारसे चालले नाहीत.

खाकी (२००४), क्या कूल है हम (२००५), ढोल (२००७), शू’टआ’ऊट ऍट वडाला (२०१३) अशा चित्रपटांनी मात्र त्याला तारले. या चित्रपटांनी त्याला एक अभिनेता म्हणून ओळख मिळवून दिली.

You might also like