एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘तुमच्यासाठी काय पण’ फेम संग्रामची बायको देखील आहे एक प्रसिद्ध अभिनेत्री, दिसते खूपच सुंदर..पहा

तुम्हाला २०१२ मध्ये स्टार प्रवाह वर लागणारी ‘देवयानी’ मालिका आठवते का? तुमच्यातल्या बऱ्याच जणांना ही मालिका आठवत असेल ती त्यातल्या ‘तुमच्यासाठी काय पण’ म्हणणाऱ्या डायलॉग मुळे. हा डायलॉग ज्या पात्रामुळे फेमस झाला ते पात्र होतं संग्रामचं आणि ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता होता संग्राम साळवी. या मालिकेतील संग्राम आणि देवयानी ची जोडी खूपच प्रसिद्ध झाली होती.या मालिकेमध्ये देवयानीची मध्यवर्ती भूमिका शिवानी सुर्वे ने केले होती.

सध्या संग्राम ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेमध्ये काम करतो आहे. त्यावेळी प्रेक्षकांना प्रश्न पडायचा की संग्राम खऱ्या आयुष्यात कुणाला “तुमच्यासाठी काय पण” हा डायलॉग ऐकवणार. या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळालं ते खुशबू तावडे च्या रूपात. ‘देवयानी’ मालिका बरीच हिट झाली आणि संग्रामला इतर मालिकांच्या ऑफर्स येऊ लागल्या.

त्यामध्ये एक मालिका होती ‘सांजबहार’. यामध्ये खुशबू तावडे देखील काम करत होती. एकत्र काम करता करता दोघे एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडिया वर शेअर करू लागले. त्यामुळे त्यांच्या अ’फेयर ची चर्चा सुरू झाली. मात्र दोघांनीही त्यावेळी यावर ‘नो कमेंट्स’ असा पवित्रा घेतला.

खुशबू तावडेने ‘एक मोहर अबोल’ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले आणि तिला लवकरच या मालिकेमुळे नवी ओळख मिळाली. खुशबूने अनेक मराठी मालिकांबरोबरच हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. पारिजात, प्यार की ये एक कहानी (२०१०), धर्मकन्या (२०१३), तारक मेहता का उल्टा चश्मा (२०१३), तेरे बिन (२०१६), आम्ही दोघी (२०१८) या तिच्या काही गाजलेल्या मालिका आहेत. ‘लव्ह फॅक्टर’ (२०१४) या चित्रपटाद्वारे खुशबूने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.


खुशबू मूळची डोंबिवलीची आहे, तर संग्राम कोल्हापूरचा आहे. दोघांची ‘सांजबहार’ च्या शूटिंगच्या वेळी वाढलेली जवळीक अनेकांच्या लक्षात आली होती पण दोघांनीही त्यावेळी याकडे लक्ष न देता आपल्या करिअर वर लक्ष केंद्रीत केले. मे २०१७ मध्ये जेव्हा संग्राम आणि खुशबूने साखरपुडा केला तेव्हा अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता.

मार्च २०१८ मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाच्या वेळी बरीच कलाकार मंडळी उपस्थित होती. ‘सांजबहार’ मधली छोटीशी लव्हस्टोरी बघता बघता सत्यात उतरली. शूटींगच्या दरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्याचे रूपांतर पुढे त्यांच्या सुखी संसारात झाले. तर मित्रहो, कशी वाटली संग्राम आणि खुशबू ची लव्ह स्टोरी? आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर कळवा.

You might also like