एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

ब्रेकिंग न्यूज! कारचालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरून फरफटत नेले,पहा व्हिडिओ..

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे, ज्यामुळे लोकांच्या मनात एक वेगळाच वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या व्हिडिओच्या माहिती आधारे एका ट्रॅफिक पोलिसाला कार चालकाने कारच्या बोनेटवर बसवून फरफटत घेऊन गेल्याची चर्चा मुंबईतील अंधेरीच्या डी. एन. नगर भागात घडली आहे. ट्रॅफिक पोलीस नो एन्ट्री मध्ये अचानक घुसलेल्या कारला थांबवत होते.

मात्र थांबवण्याचा पर्यंत करून देखील कार थांबली नाही त्यामुळे वाहतूक पोलिसांनी कारच्या बोनेटवर उडी मारून कब्जा घेतला. तरीही कार चालवणाऱ्या व्यक्तीने कार न थांबवता पोलिसाला फरकटत नेले. या घटनेनंतर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे. तेथील काही स्थानिक लोकांनी गाडी थांबवली आणि ट्रॅफिक पोलिसाला बोनेटवरून उतरवले. पण नंतर तो कारचालक कार घेऊन पळून गेला. (the driver snatched the traffic police from the bonnet of the car at andheri in mumbai)

हा प्रकार, आज म्हणजेच ३० सप्टेंबर २०२१ रोजी झाला आहे, या वाहतूक पोलिसांचे नाव विजय गुरव आहे, विजय गुरव हे पश्चिमेला आझाद नगर मेट्रो स्टेशनच्याखाली जे पी रोड येथे ड्युटीस होते. त्यावेळी अचानक MH 02 DQ 1314 क्रमांकाची काळ्या रंगाची हुंडाई क्रेटा ही कार नो एंट्रीत दाखल झाली. वाहतूक पोलीस विजय गुरव यांनी कार थांबवायचा प्रयत्न केला तरीही कार चालकाने गाडी थांबवली नाही.

मग ट्रॅफिक पोलीस विजय गुराव यांनी कारच्या आडवे जात कार थांबवायचा प्रयत्न केला जेणेकरून, गाडीतील कारचालक गाडी थांबवेल. तरीही कार चालकाने गाडी थांबवली नाही. कारच्या धक्क्यामुळे वाहतूक पोलीस विजय गुरव कारच्या बोनेटवर सरकले. त्यानंतर गाडी फास्ट घेत कार चालकाने विजय गुरव यांनी फरफटत पुढे नेले.

वाहतूक पोलीस गाडीच्या बोनेटवर असलेले पाहून देखील कार चालकाने जोरदार वेगात गाडी पुढे नेली. कारच्या बोनेटवर वाहतूक पोलीस असून देखील कार मालकाने कार थांबवली न्हवती. कार चालकाने वाहतूक पोलीस विजय गुरव यांना आझाद मैदान येथून गणेश चौकापर्यंत फरफटत घेऊन गेले. हे दृश्य गणेश चौकातील स्थानिक लोकांनी पाहिले आणि त्या कार चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वाहतूक पोलीस विजय गुरव बोनेटवरून उतरल्यानंतर कारचालकाने पोबारा केला.

Video: Source: ABP majha

You might also like