एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

तिरुपती बालाजी मंदिरात दान केलेल्या केसांचे नेमके काय होतं पुढे..जाणून व्हाल चकित..

तिरुपती बालाजी मंदिर हे आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपती गावचं मंदिर. भारतातल्या श्रीमंत मंदिरांपैकी एक अशी त्याची ओळख आहे. भारतासह भारताबाहेरील पर्यटक देखील या मंदिराला भेट द्यायला खूप दूर दूर ठिकाणांवरून येतात. अनेक भक्त निनावी पद्धतीने येथे दान करतात. तेथील दानाच्या हुंडीमध्ये भक्त नोटांची बंडले, सोन्या-चांदीच्या विटा अशा अनेक मौल्यवान वस्तू दान म्हणून टाकतात. तिरुपती बालाजीला अनेक भक्तांनी सोन्या-चांदीचे दागिने देखील केले आहेत.

नवसाला पावणारा देव म्हणूनही तिरुपती बालाजीची ख्याती आहे. अनेक भक्त नवस बोलण्यासाठी आणि नंतर तो फेडण्यासाठी येथे येत असतात. पूर्वी नवस फेडण्यासाठी म्हणून केशदान करण्याची पद्धत होती. आपली मनोकामना पूर्ण झाली तर भक्त इथे येऊन आपले मुंडण करतात आणि ते केस मंदिराला दान करून टाकतात. आधी केवळ नवस फेडण्यासाठी म्हणून केशदान केले जायचे. आता मात्र सर्रास लोक तिथे जाऊन केशदान करून येतात. पुरुषांबरोबरच स्त्रियादेखील केशदान करण्यात मागे नाहीत.

तुम्हीदेखील कधी ना कधीतरी तिरुपतीला जाऊन केशदान करून आला असालच. पण तुम्हाला माहीत आहे का की रोज एवढ्या भक्तांचे दान केलेले केस कुठे जातात? रोज हजारो भक्तांनी दान केलेल्या या केसांचं काय होत असेल पुढे? तर मित्रहो, मंदिराच्या ट्रस्ट तर्फे या केसांचा लिलाव केला जातो. यातून मंदिराला जवळपास ८० ते १०० कोटींचे उत्पन्न मिळते. काय मंडळी, आकडा ऐकून केस उभे राहिले ना?

पुढे या केसांचा उपयोग कृत्रिम केस बनवण्यासाठी केला जातो. चित्रपटांमध्ये आपण जे नकली केस किंवा केसांचा टोप बघतो, ज्याला इंग्रजीमध्ये आपण ‘विग’ म्हणतो, तो बनवण्यासाठी या केसांचा उपयोग केला जातो. परदेशात या कृत्रिम केसांना प्रचंड मागणी आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी देखील हे कृत्रिम केस वापरले जातात. दरवर्षी या मंदिराला ५ कोटीपेक्षा जास्त भाविक भेट देतात. यातले बरेचसे भक्त मुंडण करून केस दान करतात.

या केस विक्रीतून मिळालेल्या पैशांतून मंदिरातर्फे शेतकऱ्यांकडून दुधाची खरेदी केली जाते. हे दूध मंदिरात दर्शनासाठी आलेल्या लहान मुलांना तसेच महिलांना दिले जाते. या दुधाचा उपयोग पुढे तूप काढण्यासाठीही केला जातो. हे तूप देवाचा प्रसाद बनवण्यासाठी वापरले जाते. पाहिलंत मंडळी, तुम्ही दान केलेल्या केसांमागे किती मोठा इतिहास आहे ते!

You might also like