एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

आता इतक्या वर्षानंतर ‘टाइमपास’ चित्रपटातले हे कलाकार आता काय करतात? नंबर ३ नक्की पहा..

रवी जाधव दिग्दर्शित ‘टाइमपास’ चित्रपटाने सगळ्यांचा चांगलाच टाइमपास केला. रोजच्या जीवनातली काही अतरंगी पात्रं, त्यांचे धमाल डायलॉग्स आणि लोकांच्या ओठांवर नाचणारी गाणी यांनी बहार आणली. यातल्या सगळ्याच कलाकारांनी आपल्या अभिनयाने या चित्रपटाच्या यशाला चार चाँद लावले होते. तर मित्रहो, चला पाहू या चित्रपटातले हे कलाकार आता काय करतात.

१. प्रथमेश परब
प्रेक्षकांना हसवणारा, भन्नाट डायलॉग्स मारणारा, आपल्या मित्रांचा जिगरी दोस्त, प्राजू वर मनापासून प्रेम करणारा पण तिच्या बाबांकडून अशुद्ध मराठी बद्दल सतत ओरडा खाणारा असा दगडू साकारला आहे प्रथमेश परब याने. ‘टाइमपास’ नंतर त्याने उर्फी, टकाटक, झिपऱ्या, लालबागची राणी, खिचीक, ३५% काठावर पास, दृश्यम सारखे चित्रपटदेखील केले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

नाटकाची आवड असलेल्या प्रथमेशने ‘लौट आओ गौरी’, ‘दहा बाय दहा’ सारखी नाटकेही केली. म्युझिक व्हिडिओज्, मालिका यांमध्येही प्रथमेश झळकला आहे.

२. केतकी माटेगावकर
साधी, घरच्यांच्या धाकात राहणारी, दगडूच्या प्रेमाने भारावून गेलेली ‘प्राजू’ केतकीने खूप समंजसपणे रंगवली आहे. केतकीने त्याआधी ‘शाळा’ या चित्रपटात काम केले आहे. ‘टाइमपास’ नंतर ‘आरोही’, ‘तानी’, ‘काकस्पर्श’ सारखे चित्रपटही तिने केले. तिला सर्वांत आधी गाण्याच्या एका रिऍलिटी शो मध्ये प्रेक्षकांनी पाहिली होती.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ketaki Mategaonkar (@ketakimategaonkar)

घरात गाण्याची परंपरा असल्याने केतकीलाही गाण्याची आवड आहे. त्यामुळे केतकीने आपले यूट्यूब चॅनेल सुरू केले असून तिथे ती आपल्या चाहत्यांना आपल्या गोड आवाजाने मंत्रमुग्ध करत असते.

३. वैभव मांगले
प्राजूच्या बाबांची ‘शाकाल’ ची व्यक्तिरेखा रंगवली आहे वैभव मांगले या कसलेल्या कलाकाराने. या अभ्यासू अभिनेत्याने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांत कामे केली आहेत. भूमिका कोणतीही असो, वैभव यांची ती साकारण्याची स्वतःची अशी शैली आहे. एक डाव भटाचा, नवरा माझा नवसाचा, फक्त लढ म्हणा, काकस्पर्श, ट्रिपल सीट, अलबत्या-गलबत्या या त्यांच्या काही गाजलेल्या कलाकृती.

सध्या वैभव यांनी स्वतःतल्या चित्रकाराला प्रोत्साहन देत अनेक चित्रे चितारली आहेत. रॉक पेंटींग पासून सुरू झालेला त्यांच्या या प्रवासात आता विविध वस्तू, व्यक्ती आणि प्रेक्षणीय स्थळांचाही समावेश आहे.

४. भाऊ कदम
हास्यदुनियेचा सम्राट म्हणजे भाऊ कदम. टाइमपास चित्रपटात भाऊंनी दगडूच्या वडीलांची भूमिका केली आहे. अनेक मालिका, चित्रपट आणि नाटके त्यांच्या खात्यात जमा आहेत. हाफ तिकीट, झाला बोभाटा, लूज कंट्रोल, नशीबवान, सायकल, आलटून पालटून, वेडिंगचा सिनेमा, शांतेचं कार्टं चालू आहे या त्यांच्या काही गाजलेल्या कलाकृती. ‘फू बाई फू’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमांमधून ते प्रेक्षकांना नेहमीच भेटत आणि हसवत असतात.

हे कलाकार आपल्याला वेगवेगळ्या कलाकृतीतून यापुढेही भेटत राहतील हे नक्की. त्यांच्या या प्रवासासाठी आमच्या टीम कडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा!

You might also like