एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘टाइम प्लीज’ मधली ही बालकलाकार आठवते का? आता आहे हि प्रसिद्ध अभिनेत्री..जाणून चकित व्हाल

‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ असं म्हणतात. त्याप्रमाणं काही कलाकार अगदी लहान वयातच आपल्या कलागुणांची झलक दाखवून देतात. आता हेच बघा ना. ‘टाइम प्लीज’ (२०१३) चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलेली एक बालअभिनेत्री फक्त मोठी झाली नाहीये, तर आता ती एक प्रसिद्ध अभिनेत्री देखील आहे. खरं तर तिचं वय बघता तिला ‘मोठी’ म्हणणं जरा जास्तच आहे. पण तिची कामे पाहता इतक्या लहान वयातही ती ‘मोठी’ झाली आहे असं म्हणायला हरकत नाहीये.

मित्रहो, आम्ही सांगत आहोत एका बालकलाकाराची कथा. ‘टाइम प्लीज’ चित्रपटात काम केलेली अभिनेत्री होती गिरीजा प्रभू. नाव ऐकून कदाचित तुम्हाला कळणार नाही. स्टार प्रवाह वरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतली नायिका आठवते का? बरोबर. तीच ती गिरीजा प्रभू. तर मंडळी, २७ नोव्हेंबर २००० ला जन्म झालेली गिरीजा जेमतेम आपल्या विशीत आहे. तरीदेखील तिने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ याआधी अनेक चित्रपट आणि मालिकांमधून काम केलं आहे.

मूळची गोव्याची असलेली गिरीजा अजूनही तिचे शिक्षण पूर्ण करते आहे. पण शिकत शिकत तिने आपली अभिनयाची आवड देखील जपली आहे. कौल मनाचा (२०१६), काय झालं कळंना (२०१८), सेंट मेरी मराठी मिडीयम (२०१८), डॅड चिअर्स (२०१९), तुझा दुरावा (२०१९) हे तिचे काही गाजलेले चित्रपट. याबरोबरच तिने मालिकांमध्ये छोट्या छोट्या भूमिका आणि एक शॉर्ट फिल्म सुद्धा केली आहे.

Third party image reference

अभिनयाबरोबरच तिला नृत्याची पण आवड आहे. ‘युवा डान्सिंग क्वीन’ या रिऍलिटी शो मध्ये तिने भाग घेतला होता. २०१७ मध्ये झालेल्या पुणे फेस्टिवल मध्ये तिने अनेक सिनेतारकांसोबत नृत्य केले आहे. पुणे नवरात्री महोत्सव मध्येदेखील तिने आपल्या नृत्यकौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. महाराष्ट्राची श्रावण क्वीन (२०१९) या स्पर्धेत तिने तिसरा क्रमांक मिळवला होता.

गिरीजाला स्केचेस काढण्याची पण आवड आहे. तसेच ती आपल्या फिटनेसची देखील खूप काळजी घेते. सध्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधील तिची भूमिका बरीच गाजते आहे. इतक्या लहान वयातही बऱ्याच गोष्टींचा तोल सांभाळणाऱ्या गिरीजाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. लवकरच प्रेक्षकांना तिच्या नवनवीन कलाकृती बघायला मिळतील यात शंकाच नाही. अशा या लहान वयाच्या मोठ्या अभिनेत्रीला आमच्या टीम कडून तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like