एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘इंडियन आयडॉल’ च्या पर्वानंतर आदित्य करतोय हे काम ;वाचा आदित्य नारायण सध्या काय करत आहे..

काही दिवसांपूर्वीच टीव्हीवरील प्रसिद्ध रिॲलिटी शो ‘इंडियन आयडाॅल’ याचा बारावा सिझन पार पडला. या पर्वाचा विजेता पवनदीप ठरला. बाॅलीवूडमधील प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा असलेला आदित्य नारायण हा शो होस्ट अर्थात या शोचं ॲंकरिंग करायचा. पण आता हा शो संपल्यानंतर आदित्य नारायण कोणतं नवीन काम करतो आहे याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागलेली आहे. चला तर मग जाणुन घेऊयात.

‘इंडियन आयडॉल’ मध्ये सुत्रसंचालन करून झाल्यावर आता आदित्य त्याची सुट्टी एंजाॅय करताना दिसत आहे. त्यासाठी त्याची पत्नी श्वेता अग्रवाल हिच्यासोबत तो मालदीवमध्ये गेला आहे. आदित्य व श्वेता दोघेही एकमेकांना खूप आधीपासून ओळखत होते. त्या दोघांनी ‘शापित’ या चित्रपटांत एकत्र काम केले होते. इथुनच त्यांच्या चांगल्या ओळखीला सुरूवात झाली. दुर्दैवाने हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर म्हणावा तितका हिट झाला नाही.

पण ‘शापित’ नंतर झालेल्या ओळखीतून ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. श्वेता – आदित्य यांचा डिसेंबर २०२० मध्ये विवाह संपन्न झाला होता. त्यावेळेस त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालीची चर्चा दिसुन आली. ते दोघेही मालदीवमधील आपल्या सुट्ट्या अतिशय आनंदाने घालवताना पाहायला मिळत आहेत. आदित्य आणि श्वेता दोघांनीही त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditya Narayan (@adityanarayanofficial)

त्यांच्या या फोटोवर चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. मालदीवला जाताना विमानतळवरचे आणि विमानातले काही फोटोही या दोघांनी सोशल मिडियावर व्हायरल केले आहेत. यामध्ये ते दोघेही कोरोना नियमांचे पालन करताना दिसुन येत आहे. एकुणच ‘इंडियन आयडॉल’ च्या पर्वानंतर मिळालेली सुट्टी आपली पत्नी श्वेता बरोबर आदित्य आनंदाने घालवत आहे.

मालदीवच्या एका रिसाॅर्टवर श्वेता अग्रवाल विश्रांती घेताना पाहायला मिळत आहे. एखादा प्रोजेक्ट संपला कि अशा सुट्ट्या व्यथित करणं हे बाॅलीवूडमधील कलाकारांचं नित्याचं झालेलं आहे. त्यात आदित्यने श्वेताशी नुकतच लग्न केलं असल्याने या दोघांसाठी ही ट्रीप विशेष असणार हे नक्की.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditya Narayan (@adityanarayanofficial)

या सुट्ट्यांमधील दोघांचे फोटो दोघेही आपल्या चाहत्यांसाठी व्हायरल करताना दिसत आहेत. त्याला प्रेक्षकांचाही प्रचंड रिस्पॉन्स पाहायला मिळत आहे. त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना हर्ट रिॲक्ट केल्याचे दिसते. ही सुटी संपल्यावर आदित्य पुन्हा ‘सारेगमप’ मध्ये सुत्रसंचालन करताना आपल्याला दिसेल. आदित्यने आपल्या करियरची सुरवात याच शो पासून केली होती.

You might also like