एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

या विनोदी अभिनेत्याची पत्नी आहे इतकी सुंदर… या चित्रपटांमध्ये केलं आहे काम..

सत्तर आणि ऐंशीच्या दशकांत अनेक चित्रपटांमध्ये एक व्यक्तिरेखा नेहमी दिसत आली आहे. मुख्य नायकाच्या मित्राची ही भूमिका होती. ही भूमिका बऱ्याच वेळा अभिनेते असरानी यांनी निभावली आहे. तसेच बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक विनोदी पात्रे रंगवली आहेत. आपल्या अनोख्या विनोदी शैलीमुळे असरानी हा विनोदाचा हुकुमी एक्का होता. त्यांची ‘शोले’ चित्रपटातील ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ ची भूमिका प्रचंड गाजली होती.

Third party image reference

१ जानेवारी १९४० रोजी जन्मलेल्या असरानी यांचे नाव गोवर्धन असरानी आहे. त्यांनी जवळपास ३५० पेक्षा जास्त हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. १९६७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हरे कांच की चुडियाँ’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘चला मुरारी हिरो बनने’ (१९७७) आणि ‘सलाम मेमसाब’ (१९७९) यांसारख्या चित्रपटात त्यांनी मुख्य नायकाच्या भूमिकाही केल्या आहेत. हिंदीसह त्यांनी अनेक गुजराती चित्रपटांमध्येही काम केलं आहे. १९७४ ते १९९७ च्या दरम्यान त्यांनी जवळपास सहा चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

‘आज की ताजा खबर’ (१९७३) आणि ‘नमक हराम’ (१९७३) या चित्रपटांच्या चित्रिकरणादरम्यान असरानी यांची ओळख सहकलाकार मंजू बन्सल यांच्याशी झाली. या दरम्यान दोघे प्रेमात पडले आणि त्यांनी पुढे लग्न केलं. मंजू बन्सल यांनी जवळपास दहा पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांनी केवळ गाणी किंवा सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका केल्या असल्याने त्यांना फारसे काम मिळत नव्हते. १९९५ मध्ये मंजू यांनी ‘माँ की ममता’ नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते.

Third party image reference

मंजू यांनी दिवानगी (१९७६), उधार का सिंदूर (१९७६), कबिला (१९७६) या चित्रपटांमध्ये भूमिका निभावल्या आहेत. असरानी आणि मंजू यांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. तपस्या (१९७६), चांदी सोना (१९७७), जान-ए-बहार (१९७९), जुर्माना (१९७९), नालायक (१९७९), सरकारी मेहमान (१९७९), चोर सिपाही (१९७९) या चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले आहे. असरानी यांनी आपल्या होम प्रोडक्शन तर्फे १९८० मध्ये ‘हम नहीं सुधरेंगे’ या चित्रपटाची निर्मिती केली. मंजू आणि असरानी या दोघांनी या चित्रपटात देखील एकत्र काम केले होते.

Third party image reference

मंजू बन्सल-असरानी या जरी सत्तर आणि ऐंशीच्या दशकांत कार्यरत असल्या तरी त्या आजही खूप सुंदर दिसतात. चाहत्यांना असरानी आणि मंजू यांची जोडी पुन्हा चित्रपटांमधून पाहायला नक्कीच आवडेल.

You might also like