एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

केवळ ५०० रुपये ते १२ बेडरूमचे घर! संघर्ष रवी किशनच्या सिनेप्रवासाचा..

रवींद्र श्यामनारायण शुक्ला उर्फ अभिनेता रवी किशन म्हणजेच भोजपुरी इंडस्ट्री मधलं आघाडीचं नाव. भोजपुरी बरोबरच रवी किशनने अनेक हिंदी, तेलगू, कन्नड आणि तमिळ चित्रपटांमध्येही भूमिका निभावल्या आहेत. भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये रवी किशन हे जरी आघाडीचं नाव असलं तरी त्याचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता.

१९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पीतांबर’ या हिंदी चित्रपटाद्वारे रवी किशन ने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. चित्रपटांबरोबरच त्याने अनेक मालिकांमध्येही कामे केली आहेत. २००६ मध्ये त्याने ‘बिग बॉस’ आणि २०१२ मध्ये ‘झलक दिखला जा’ या रिऍलिटी शोज् मध्ये देखील भाग घेतला होता.

रवी किशनचा जन्म १७ जुलै १९६९ रोजी मुंबई मध्ये झाला. त्याच्या वडीलांचा डेअरीचा व्यवसाय होता. परंतु हा व्यवसाय तितकासा यशस्वी न झाल्याने त्याचे बालपण अत्यंत हलाखीत गेले. पुढे त्याच्या वडीलांचा व्यवसाय डबघाईला आला आणि त्याचे कुटुंब आपल्या मूळगावी म्हणजेच उत्तर प्रदेश मधील जौनपूरला परतले.

रवी किशनला लहानपणापासूनच चित्रपट आणि अभिनयाची आवड होती. अमिताभ बच्चन हे त्याचे आवडते अभिनेते. त्यांचे सगळे चित्रपट त्याने पाहिले आहेत. मात्र त्याचे वडील त्याच्या या आवडीच्या विरोधात होते. त्याच्या या छंदापायी त्याने बऱ्याचदा आपल्या वडीलांचा मार देखील खाल्ला आहे.

पण त्याच्या आईने त्याची ही आवड समजून घेत त्याला पाठींबा दिला. रवी किशन ने वयाच्या १७ व्या वर्षी आईकडून ५०० रुपये घेतले आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई गाठली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ravi Kishan (@ravikishann)

पण इथून पुढचा प्रवास अजून खडतर होता. पैसे वाचवण्यासाठी कधी पायी फिरणे, कधी फक्त वडापाव खाणे, तर कधी उपाशी पोटी झोपणे सुरू होते. ‘पीतांबर’ नंतर देखील त्याने अनेक चित्रपटांमध्ये कामे केली. त्याला खरी प्रसिद्धी मिळाली ती सलमान खानच्या ‘तेरे नाम’ चित्रपटातील त्याच्या भूमिका चावलाच्या होणाऱ्या नवऱ्याच्या भूमिकेमुळे.

चित्रपटाबरोबरच त्याच्या भूमिकेलाही प्रसिद्धी मिळाली आणि रवी किशनचे भाग्य बदलले. यशाच्या मार्गावर चालताना ‘मुक्ति’, ‘शेअर बाजार’, ‘अग्निमोर्चा’ सारखे चित्रपट त्याने केले. भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये आज त्याला ‘भोजपुरी अमिताभ’ म्हणून ओळखले जाते, एवढी त्याची प्रसिद्धी आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ravi Kishan (@ravikishann)

मुंबईच्या चाळीत राहणारा रवी किशन आता गोरेगावमध्ये एका ड्युप्लेक्स घरात राहतो. त्याचे हे घर जवळपास ८,००० स्क्वेअर फूट असून त्यात १२ बेडरूम, भले मोठे टेरेस, जिम यादेखील गोष्टी आहेत.

या सगळ्याचे श्रेय तो आपल्या वडीलांना देतो. त्याचे वडील पुरोहित असल्याने त्यांनी त्याला सगळ्या चांगल्या सवयी लावल्या, असे तो म्हणतो. तो शंकराचा कट्टर भक्त आहे. वडीलांच्या संस्कारांमुळेच संघर्षाच्या काळात वाईट गोष्टींचा सामना करावा लागला तरी तोल ढळू दिला नाही, असेही तो म्हणतो.

You might also like