एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

काश्मीर बाबत तालिबानची भूमिका स्पष्ट; आता भारताच्या भूमिकेवर लक्ष..

नुकताच भारताने १५ ऑगस्ट ला आपला स्वातंत्र्य दिन साजरा केला. एकीकडे आपला देश स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत असताना तिकडे एक देश मात्र आपले स्वातंत्र्य गमावून बसला आहे असे वाटते.

अफगाणिस्तान वर तालिबानी संघटनेने कब्जा केला आहे. अफगाणिस्तानमधील अमेरिकी सैन्य परत आपल्या मातृभूमीत परतलं आहे. हे सैन्य परततातच तालिबानने अफगाणिस्तानवर बळाने कब्जा केला आहे. पाकिस्तानने लगेचच तालिबानचे स्वागत केले असून त्यामागोमाग चीन आणि बांग्लादेशनेही पाकिस्तानची री ओढत तालिबानचे सत्तेवर स्वागत केले आहे.

अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर ताबा मिळवत तालिबानने संसद आणि राष्ट्रपती भवन हाती घेतले आहे. तालिबानच्या या कृतीमुळे अनेक नागरिक देश सोडून जात आहेत.

अफगाणिस्तानचे अध्यक्ष आधीच देश सोडून गेले आहेत. पाकिस्तान, चीन आणि बांग्लादेशने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता भारताच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत भारताची भूमिका काय असेल हे ठरवण्यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक सुरू आहे.

अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापना केव्हा आणि कशी होईल, तसेच जनतेप्रती त्यांचा व्यवहार कसा असेल यावर भारत लक्ष ठेवून आहे. अन्य लोकशाही देश यावर काय भूमिका घेतात, यावरही भारताची नजर आहे.

पाकिस्तानची आयएसआय (ISI) संस्था तालिबानला प्रभावित करण्याचा आणि काश्मीरविरोधात भडकवण्याचा प्रयत्न करू शकते, तसेच अफगाणिस्तान हा द’ह’श’तवादाचा केंद्रबिंदू बनू शकतो, ही काळजी भारताला आहे. भूतकाळात अफगाणिस्तानात पाकिस्तानी दह’श’तवादी संघटनांचे कॅम्प होते. त्यामुळे काश्मीरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

दरम्यान तालिबानने काश्मीरबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काश्मीर द्विपक्षीय आणि भारत-पाकचा अंतर्गत मुद्दा आहे. त्यामुळे काश्मीरवर आमची नजर नाही, असे तालिबानने स्पष्ट केले.

अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर दुसऱ्या देशांविरोधात करणार नाही असे आश्वासन देत तालिबानने भारताला अफगाणिस्तानमधील प्रकल्प पूर्ण करण्यास परवानगी दिली आहे. भारताने अफगाणिस्तानमध्ये खूप गुंतवणूक केली आहे. हे प्रकल्प जनतेच्या भल्यासाठी आणि विकासासाठी असल्यास भारताने ते जरूर पूर्ण करावेत, असेही तालिबानने सांगितले आहे.

तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीनने सांगितले, की अफगाणिस्तानची जमीन स्वतःच्या फायद्यासाठी, त्यांच्या देशाच्या स्वार्थासाठी वापरत असल्यास आम्ही त्याला परवानगी देणार नाही.

सध्या भारताची बरीच गुंतवणूक अफगाणिस्तानात अडकली असली तरी पाकिस्तान सद्यस्थितीचा फायदा घेऊन पुन्हा दह’शतवा’दी कारवाया सुरू करेल अशी भीती असल्याने भारताने सध्या सावध भूमिका घेतली आहे.

You might also like