एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

काय आहे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय च्या लग्नामागचं खरं कारण? का झालं या दोघांचं लग्न?

बॉलिवूड मध्ये तसं बघायला गेलं तर प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट होतो. झुमक्यांपासून ठुमक्यांपर्यंत आणि वाढदिवसापासून लग्नापर्यंत बॉलिवूड मधल्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होते. अशावेळी दोन मोठे सुपरस्टार्सनी जर एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तर त्याची चर्चा तर होणारच. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अनेक उलट सुलट चर्चा झाल्या. काहींनी या दोघांना शुभेच्छा दिल्या तर काहींनी हे केवळ फायदा बघून केलेले लग्न आहे असा शेराही मारला.

२० एप्रिल २००७ रोजी ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा विवाह थाटात पार पडला. ही दोन्ही नावे बॉलिवूड मध्ये प्रचंड गाजलेली आहेत. एक विश्वसुंदरी तर दुसरा बॉलिवूडच्या सुपरस्टारचा मुलगा. या दोन गोष्टींमुळेच अभिषेक आणि ऐश्वर्याने एकमेकांशी लग्न केले असे नेहमी बोलले जात होते. हे अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज यावरही नेहमी चर्चा होत राहिल्या. मात्र अभिषेकने यावर एक खु’ला’सा केला आहे.

अनेक कार्यक्रमांमध्ये अभिषेक ला ‘ऐश्वर्याने तुझ्याशी लग्न का केलं?’ असा प्रश्न विचारला गेला आहे. या दोघांचं लग्न झालं तेव्हा अभिषेकने आपल्या करिअर मध्ये अजून फार काही मोठी कामगिरी केली नव्हती. ऐश्वर्याचे आधी सलमान खान बरोबर अफेयर होते.

त्यांच्या ब्रे’क’अप नंतर तिच्या आणि विवेक ओबेरॉयच्या अ’फेय’रच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अभिषेक ऐश्वर्या पेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. त्यामुळे या दोघांनी नक्की एकमेकांशी कोणत्या कारणासाठी लग्न केलं, हे अनेक जणांना पडलेलं कोडं होतं.

‘उमराव जान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेकची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. जानेवारी २००७ मध्ये अभिषेकने न्यूयॉर्क मधील एका हॉटेलच्या बाल्कनीमध्ये ऐश्वर्याला प्रपोज केलं होतं.

त्यांच्या लग्नाबाबत अभिषेकने २०१४ मध्ये ‘कॉफी विद करण’ मध्ये खु’ला’सा करताना सांगितले, की “ऐश्वर्यानं मी अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे किंवा मी स्टार आहे म्हणून लग्न केलेलं नाही. तसंच मी सुद्धा ती जगातली सर्वांत सुंदर स्त्री आहे किंवा खूप मोठी स्टार आहे म्हणून तिच्याशी लग्न केलेलं नाही. वास्तवात असं काहीच नाही. आम्ही व्यक्ती म्हणून एकमेकांच्या प्रेमात पडलो.”

अभिषेकच्या या वक्तव्यामुळे अनेक उलट सुलट चर्चांना अखेर विराम मिळाला आहे. सध्या या दोघांना ‘आराध्या’ नावाची मुलगी आहे. दोघेही आपल्या संसारात खूष आहेत. काय मग मंडळी, तुम्हाला आवडते का ही स्टार जोडी? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा.

You might also like