एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

९० किलो वजन ते ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक! नीरज चोप्राचा प्रवास पाहून बॉलिवूड अभिनेता झाला थक्क..

ऑलिम्पिक २०२० सुरू झाले आणि अखंड भारत आपल्या ऑलिम्पिक खेळाडूंवर आशा लावून बसला. रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई झाली. आता आशा होती ती सुवर्णपदकाची. भालाफेकपटू नीरज चोप्राने हेदेखील स्वप्न पूर्ण केले. त्याने केवळ एक स्वप्न पूर्ण केले नाही, तर त्याने रचला इतिहास. ट्रॅक अँड फिल्ड प्रकारातील पहिले सुवर्णपदक मिळवण्याचा मान नीरज चोप्राने पटकावला.

गेल्या १२१ वर्षांत भारताला ट्रॅक अँड फिल्ड इव्हेंट्स मध्ये एकही पदक मिळवता आले नव्हते. नीरजने पदकांचा हा दुष्काळ यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये संपवला.

भारतभरातून नीरजवर शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बॉलिवूड सेलिब्रेटीदेखील यात मागे नाहीत. मात्र एका बॉलिवूड अभिनेत्याने एका वेगळ्याच गोष्टीसाठी नीरजचे अभिनंदन केले आहे.

नीरज चोप्रा जेव्हा १२ वर्षांचा होता, तेव्हा त्याचे वजन तब्बल ९० किलो होते. लठ्ठपणाचा सामना करत नीरजने आपले वजन कमी केले. एवढेच नाही तर मेहनत करून एक यशस्वी भालाफेकपटू होऊन दाखवले. त्याही पुढे जाऊन त्याने ऑलिम्पिक मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत भारत देशाचे नाव उज्ज्वल केले. नीरजचा हा सगळा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे.

नीरजच्या याच प्रवासाचे कौतुक केले आहे अभिनेता अर्जुन कपूर याने. अर्जुन कपूर याने देखील लठ्ठपणाचा सामना केला आहे. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी अर्जुनचे वजन १५० किलोच्या आसपास होते. त्यानेदेखील मेहनत करून आपले वजन कमी केले आणि आज दिसणारा हॅण्डसम अर्जुन कपूर इंडस्ट्रीला मिळाला. अर्जुन कपूरने स्वतः या गोष्टींचा सामना केल्याने त्याला नीरज चोप्राचा प्रवास फारच प्रेरणा देणारा वाटतो. नीरजची त्यासाठी करणारी एक पोस्ट अर्जुनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून शेअर केली आहे.

Source:loksatta

आपल्या या पोस्ट मध्ये अर्जुन कपूर लिहितो, “लठ्ठपणाशी केवळ सामना करणे हेदेखील शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकवणारे आहे. या मुलगा (नीरज चोप्रा) मात्र केवळ लठ्ठपणाशी लढलाच नाही, तर खेळावर लक्ष केंद्रीत करत त्याने ऑलिम्पिक पदक देखील जिंकून दाखवले! नीरज, तू माझ्यासाठी आणि सगळ्या देशासाठी एक प्रेरणा आहेस.” नीरज चोप्राने जे करून दाखवले, ते खरंच खूप प्रशंसनीय आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

नवीन पिढी नक्कीच देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी नीरज कडून प्रेरणा घेईल यात शंका नाही. नीरज सारख्या खेळाडूंमुळे नवीन मुलांना खेळामध्ये कारकीर्द घडवण्याचे प्रोत्साहन मिळते.

You might also like