एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बायको झाली गायब! सीसीटीव्ही बघताच नवऱ्याला बसला धक्का…

नवरा आणि बायकोचे नाते हे खूप सुंदर असते. पण ते तितकेच नाजूकदेखील असते. थोडासा हलगर्जीपणा किंवा दुर्लक्ष केलं तर या नात्याचे तीनतेरा वाजण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. पती आणि पत्नीलाच अशावेळी या सगळ्यांतून मार्ग काढावा लागतो. नाहीतर त्यांचे नाते संपुष्टात येऊ शकते. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली आहे. नात्यामध्ये केलेले दुर्लक्ष तुमच्या नात्याच्या मुळावरच उठू शकते, हेच या घटनेवरून दिसून येते.

रात्री झोपलेला असताना पतीला अचानक जाग आली. काही विचित्र आवाजांमुळे त्याला जग आली होती. पती घाबरला. त्याला वाटले घरात चोर शिरले आहेत. म्हणून त्यानं सीसीटीव्ही चेक केला. मात्र सीसीटीव्ही वर त्याला जे दिसलं ते पाहून तो सुन्न झाला. त्याची पत्नी असे काहीतरी करेल असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. मित्रहो, ही कोणत्याही नवीन चित्रपटाची कथा नाहीये. ही आहे खरी घटना.

द सन ने दिलेल्या वृत्तानुसार, रात्री जेव्हा या पतीला जाग आली तेव्हा त्याला काही विचित्र आवाज ऐकू आले. घरात चोर शिरल्याचा संशय आला म्हणून त्याने लगेच सीसीटीव्ही चेक केला. मात्र त्याला त्यात जे दिसलं ते पाहून तो सुन्न झाला. त्याला दिसलं की त्याची पत्नी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या पुरुषाचे चुं’ब’न घेत होती. हा शेजारी या पतीचा चांगला मित्र असून विशेष म्हणजे तो विवाहित आहे. आपल्या पत्नीला आणि मित्राला अशा अवस्थेत पाहिल्यानंतर पतीला धक्का बसला.

पतीने याबद्दल पत्नीकडे विचारणा केली. त्याला वाटले पत्नीचे कृत्य पकडले गेल्याने ती माफी मागेल. मात्र तिने जे सांगितले ते ऐकून पतीला काय करावे ते कळेना. पत्नीने त्याला स्पष्टपणे सांगितले, की तिचं त्या शेजाऱ्यावर प्रेम आहे आणि तिला तिच्या पतीसोबत राहायचे नाही आहे. तिने पुढे हेही सांगितले, की गेले कित्येक महिने ती शेजाऱ्याबरोबर वेळ घालवत आहे. शेजाऱ्याबरोबर आपले अफेयर असल्याचे देखील तिने यावेळी कबूल केले.

मात्र या सगळ्याला पत्नीने पतीलाच जबाबदार धरले आहे. तिने सांगितले, की लग्नानंतर पती बदलला आहे. तो आधीसारखे तिच्यावर प्रेम करत नाहीये, आधीसारखी तिची काळजी घेत नाहीये. त्यामुळेच ती शेजाऱ्याच्या प्रेमात पडली असल्याचे तिने सांगितले. आता या सगळ्या प्रकरणामुळे पती मात्र प्रचंड तणावाखाली आहे. त्यांच्या नात्याचे पुढे काय होणार, याबद्दल आता त्याला चिंता लागून राहिली आहे.

source: Lokmat

You might also like