एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

मुलगा आहे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता! पण आई-वडील आजही करतात बसने प्रवास…

काही बॉलिवूड सेलिब्रेटी एका चित्रपटाच्या यशानेच हुरळून जातात. स्टारडमची हवा लगेच त्यांच्या डोक्यात जाते. काही सेलिब्रेटी मात्र कितीही यशस्वी झाले तरी त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर असतात. जॉन अब्राहम हा त्यातलाच एक अभिनेता. त्याच्या सुरुवातीच्या दिवसांत तो त्याच्या गालावर पडणाऱ्या खळीमुळे आणि त्याच्या स्टाईलसाठी जास्त प्रसिद्ध होता.

कॉमेडी, ऍक्शन अशा चित्रपटांबरोबरच त्याने काही चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका देखील साकारल्या आहेत. अनेक गंभीर विषयावरील चित्रपटांमध्येही त्याने तितक्याच मन लावून भूमिका निभावल्या आहेत. मॉडेलींग मधून जॉन चित्रपट क्षेत्रात आला आणि त्याने स्वतःच्या मेहनतीने नाव कमावले. जॉनने स्वतःचे ‘जे. ए. एंटरटेनमेंट’ नावाचे प्रॉडक्शन हाऊस देखील सुरू केले आहे. या निर्मिती संस्थेद्वारे बऱ्याच उत्तम चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

जॉनचा जन्म १७ डिसेंबर १९७२ रोजी झाला. जॉनची आई पारशी आहे, तर वडील ख्रिस्ती आहेत. जॉनचे पारसी नाव ‘फरहान’ आहे. त्याच्या वडिलांनी त्याचे नाव जॉन ठेवले होते. मात्र त्याची आई त्याला अजूनही ‘फरहान’ या नावानेच हाक मारते. त्याचे आईवडील अत्यंत साधे आहेत. जॉन देखील घरी आपल्या आईवडिलांबरोबर वेळ घालवताना तितक्याच साधेपणाने वागतो. इतरवेळी देखील आपण त्याला अत्यंत साधेपणाने वागताना बघू शकतो.

जॉन सांगोत, की ‘माझे आई-वडील अत्यंत साधे आणि चांगल्या स्वभावाचे व्यक्ती असून त्यांनी कधीच फसवेगिरी केलेली नाही. त्यामुळे प्रामाणिकपणा काय असतो हे मला कायमच त्यांच्याकडे बघून समजलं आहे. आयुष्य जगताना प्रामाणिकपणे आणि कष्ट करत जगण्याची प्रेरणा मला माझे आईवडीलच देतात. नेहमीच माझ्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून मी माझ्या वडिलांसोबत फुटबॉल मॅच बघत असतो. पण एक दिवस त्यांच्याबरोबर युरोपला जाऊन फुटबॉल मॅच बघायची इच्छा आहे.’

आपल्यातला साधेपणा हा आपल्या आईवडिलांकडूनच आल्याचे तो सांगतो. ‘मी जरी आज कोट्यवधी संपत्तीचा मालक असलो, तरी माझे आईवडील साधारण रिक्षा किंवा बसने देखील प्रवास करतात. कारण आजवर ते तसेच आयुष्य जगात आले आहेत आणि त्यात त्यांना कधीही अडचण आलेली नाही. त्यामुळे त्या सगळ्यात बदल करण्याची त्यांना गरजसुद्धा वाटली नाही.’ त्यांच्या साधेपणाबद्दल तो पुढे सांगतो, की ‘त्यांना सर्वसाधारण व्यक्तीचे आयुष्य जगण्यात जास्त आनंद मिळतो आणि मला तो आनंद त्यांच्यापासून हिरावून घ्यायचा नाही. मी देखील त्यांचे अनुकरण करतच साधारण आयुष्य जगणे पसंत करतो.’

You might also like