एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

लहानपणी सामान्य दिसणाऱ्या या अभिनेत्रीचा आज वाजतोय जगभरात डंका! अन् नाव तिचे..

जमशेदपूर मधून आलेली एक मुलगी, अभिनय आणि मॉडेलिंगची कोणतीही पार्श्वभूमी नसताना चक्क विश्वसुंदरीचा किताब जिंकते. इतकेच नाही तर बॉलिवूड मध्ये स्वतःच्या हिंमतीवर नाव कमावते. हे कमी की काय, मग ती चक्क हॉलिवूड मध्ये देखील मजल मारते आणि मग तिचे जगभरात चाहते निर्माण होतात.

एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी कथा. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण ही घडली आहे खऱ्या आयुष्यात. ही यशोगाथा आहे एका अशा अभिनेत्रीची जिच्याकडे ब्युटी आणि ब्रेन दोन्ही आहेत आणि त्या बळावर तिने आज जग जिंकले आहे.

आम्ही बोलत आहोत अभिनेत्री प्रियांका चोप्रा बद्दल. नुकतेच तिच्या बालपणीचे काही फोटो सोशल मीडिया वर व्हायरल झाले आहेत. एक फोटो ती अगदीच लहान असतानाचा आहे, तर दुसरा ती शाळेत असतानाचा आहे. या दोन्ही फोटोंकडे बघितल्यावर ही अतिसामान्य दिसणारी मुलगी पुढे जाऊन अभिनेत्री बनेल, असे जर त्यावेळी कुणी सांगितले असते तर कोणाचाच विश्वास बसला नसता. तिचा लहानपणीचा फोटो आणि आताचा फोटो पाहिला असता तिच्यात झालेला बदल तुमच्या लक्षात येईल.

लहानपणी तुमच्या आमच्या सारखी सर्वसामान्य दिसणारी ही मुलगी मोठेपणी खूपच सुंदर, ग्लॅ’मरस आणि बोल्ड झाली आहे. इतकेच नाही, तर वयाच्या १८ व्या वर्षी म्हणजेच २००० मध्ये तिने ‘मिस वर्ल्ड’ हा किताब देखील जिंकला आहे.

सध्या बॉलिवूड मधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या आणि सर्वाधिक यशस्वी असणाऱ्या अभिनेत्रींपैकी प्रियांका एक आहे. बॉलिवूड मध्ये नाव कमावल्यानंतर प्रियांकाने हॉलीवूडकडे आपला मोर्चा वळवला. इंग्रजी चित्रपट आणि मालिकांमध्ये नाव कमावण्यात प्रियांका यशस्वी ठरली. आज ती हॉलिवूड मधील एक मोठं प्रस्थ आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra)

डिसेंबर २०१८ मध्ये तिने अमेरिकन गायक आणि अभिनेता निक जोनास बरोबर लग्नगाठ बांधली. त्याच वर्षीच्या मे महिन्यापासून निक आणि प्रियांका एकमेकांना डे’ट करायला लागले होते. जुलै महिन्यात निकने तिला प्र’पोज केले आणि ऑगस्ट महिन्यात दोघांचा साखरपुडा देखील झाला. दोघेही आता लॉस अँजेल्स मधील त्यांच्या आलिशान घरात राहतात. निक प्रियांकापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. पण प्रेमात सगळं माफ असतं असं म्हणतात. एकमेकांवरच्या प्रेमामुळे त्यांनी हे लग्न केले असल्याचे त्यांनी सांगितले.

तर मंडळी, लहानपणी सामान्य दिसणारी पण आता सुंदर आणि यशस्वी असेल्या प्रियांका चोप्राच्या या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटते? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा.

You might also like