एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

तेजस्विनी पंडीतचा ‘स्वॅग’ होतोय व्हायरल! बघा तिचा हटके लूक…

सध्या सोशल मीडिया वर सध्या तेजस्विनी पंडीतची हवा वाहते आहे. जिकडे बघावे तिकडे तेजस्विनीचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. तशी तर तेजस्विनी नेहमीच सुंदर दिसते. तिच्या सगळ्याच फोटोंची चर्चा होत असते. आपल्या मनमोहक अदांनी ती नेहमीच आपल्या चाहत्यांना घा’या’ळ करत असते. मग यावेळी असे काय झाले आहे की लोकांना तिचा लूक एकदम हटके वाटतोय? असा कोणता लूक आहे जो आधी लोकांनी पाहिला नाहीये?

तेजस्विनी पंडीत जशी आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत असते, तशीच ती तिच्या अभिनयामुळेही सगळ्यांची आवडती अभिनेत्री बनली आहे. अगंबाई अरेच्चा!, तू ही रे, मी सिंधुताई सपकाळ, ७ रोशन व्हिला, ये रे ये रे पैसा यांसारख्या चित्रपटातून तिने आपल्या दर्जेदार अभिनयाची झलक दाखवली आहे. अनेक मालिकांमधून देखील ती आपल्या भेटीला आली आहे. नुकतीच ती ‘समांतर २’ या वेब सिरीज मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

तेजस्विनी नेहमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून काही ना काही तरी शेअर करत असते. तिचे, फोटो, व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसतात. आता देखील तिने शेअर केलेला फोटो असाच व्हायरल होत आहे. यामध्ये ती एकदम हटके दिसत आहे. यलो ट्रॅकसूट, डोक्यावर स्वॅगवाली तिरकी टोपी आणि पिंक शूज असा तिचा लूक आहे. या लूक मध्ये ती खूप कूल दिसत आहे. तिचा हा स्वॅगी लूक चाहत्यांना जाम आवडून गेला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्याचबरोबर तिच्या इंडस्ट्रीतल्या मित्रमैत्रिणींनीही या फोटोला लाईक करत कमेंट्स केल्या आहेत. “अटबॉय” अशी कमेंट करत स्वप्नील जोशीने तिच्या या लूकला प्रोत्साहन दिले आहे.

सिद्धार्थ जाधवने “बंड्या आता काही कुणाचं Akon घेत नाही बाबा… लव्ह्ड इट. फुल स्वॅग” अशा शब्दांत तिचे कौतुक केले आहे. अभिनेता पियूष रानडे आणि अभिनेत्री ऋतुजा बागवे बरोबरच इतर अनेक कलाकारांनी तेजस्विनीच्या या लूकचे कौतुक केले आहे.

तेजस्विनीच्या अदांवर भाळणारे बरेच आहेत. आता वेळ आहे तिच्या कूल स्वॅगला लाईक करायची. तेजस्विनीचा ‘१०० डेज’ मधला लूकदेखील असाच व्हायरल झाला होता. आपल्या मादक अदांनी आणि गोडगोड संवादांनी तिने प्रेक्षकांना पार वेड लावलं होतं. आता देखील ती रोज आपले नवीन नवीन लूक मधले फोटो शेअर करत चाहत्यांना घायाळ करत असते.

You might also like