एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

आई बाबांसोबत दिसणारी ही गोंडस चिमुकली आठवली का? मराठी इंडस्ट्रीमधील आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री…

मराठी अभिनेत्री सुद्धा सध्या नावारूपाने येत आहेत. अपयश ही यशाची पहिली पायरी जरी असली तरी काहींना लवकरच यश मिळते आणि ते भले मोठे स्टार होतात यातूनच ते खूप नावारूपाला येतात आणि मग त्यांना खूप साऱ्या नवनवीन प्रोजेक्ट मध्ये काम मिळू लागते. सध्या मित्रानो सोशल मीडिया माध्यमातून खूप जणांचे लहानपणीचे फोटो शेयर करायची जणू काही पद्धत आली आहे.

खूप सारे कलाकार आपले जुने फोटो इन्स्टाग्रामवर टाकून ‘मला ओळखा पाहू ?’ असे खूप सारे प्रश्न विचारत आहेत. त्यावर चाहते देखील भन्नाट कमेंट्स टाकतायेत. त्यामुळे हे फोटो काही बिग फॅन चाहत्यांनकडून सोशल मीडियावर देखील अपलोड केले जात आहेत.

आत्ताच आमच्या टीमला एक नवीन फोटो सोशल मीडियामधून मिळाला आहे, ज्याबद्दल आम्ही बोलणार आहोत. श्रोत्यांनो वरील तुम्ही फोटो पाहिला असेल त्यावर तुम्हाला असा नक्की प्रश्न पडला असेल की फोटोत दिसणारी ही सुप्रसिद्ध अभिनेत्री नक्की आहे तरी कोण ? चला तर पण, मग विचार करणे थांबवा. आम्ही सांगतो, फोटोमध्ये दिसत असलेली छोटी गोंडस मुलगी म्हणजे मराठी इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान.

तेजश्री यांनी गोजिरवाण्या घरात (२००७) आणि तुझं नि माझं घर श्रीमंताच (२००८) या मालिकेत पात्र निभावले होते. याचबरोबर होणार सून मी या घरची (२०१३), प्रेम हे (२०१६), अग्गबाई सासूबाई (२०१९) या मालिकेत त्यांनी मुख्य भूमिका बजावल्या. या मालिकांनमधून त्यांना खूप सारी प्रसिद्धी मिळाली.

झेंडा या चित्रपटाद्वारे तेजश्री यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते, त्यानंतर त्यांनी कर्तव्य, शर्यत, लग्न पहावे करून, डॉ. प्रकाश बाबा आमटे, ओली की सुकी या चित्रपटांमध्ये देखील भूमिका केल्या.

त्यांना खूप साऱ्या माध्यमातून यश मिळत गेले होणार सून मी या घरची या मालिकेतून त्या घराघरात पोहचल्या. याच मालिकेतील मुख्य अभिनेते शशांक केतकर यांच्यासोबत त्यांनी लग्न केले. पण काही कारणास्तव त्यांच्यामध्ये एका वर्षातच घट’स्फो’ट झाला.

या तिच्या घ’ट’स्फोटाबद्दल तेजश्री प्रधान यांच्या मातोश्री याना खूप काही लोकांनी सुनावले होते पण तरीही त्यांना कोणत्याच गोष्टीचे वाईट वाटले नाही. तेजश्री प्रधान म्हणतात की आई माझ्या प्रत्येक निर्णयात मला पाठिंबा देत असते.

You might also like