एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

चाहते पडले तेजश्रीच्या प्रेमात! सोज्वळ आणि सुंदर लूक झाला व्हायरल…

झी मराठी वाहिनी वरील ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेने सगळ्या महाराष्ट्राला आदर्श सून कशी असावी याचं स्वप्न दाखवलं. यात सगळ्यात मोठा वाटा होता तो मालिकेतील सुनेचा. ही सोज्वळ, समजूतदार, सगळ्यांना सामावून घेणारी सून साकारली होती तेजश्री प्रधान या गुणी अभिनेत्रीने. प्रेक्षक ना ही मालिका विसरले आहेत, ना मालिकेतील कलाकारांना. तेजश्री प्रधानच्या या भूमिकेने तिला खूप लोकप्रियता मिळवून दिली.

तेजश्रीने त्या आधीही मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र तिची ही भूमिका सगळ्यांच्याच कायम लक्षात राहिलेली आहे. या भूमिकेमुळे तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिच्या या भूमिकेने तिला मोठा चाहतावर्ग देखील मिळवून दिला आहे. हा सगळा चाहतावर्ग तिला सोशल मीडिया वर फॉलो करत असतो. तेजश्री देखील आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया वर शेअर करत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात रहात असते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 𝐓𝐞𝐣𝐚𝐬𝐡𝐫𝐢 𝐏𝐫𝐚𝐝𝐡𝐚𝐧 (@tejashripradhan)

नुकताच तेजश्रीने सोशल मीडिया वर आपला एक फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो पाहून चाहते तिच्या प्रेमातच पडले आहेत. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली आहे. शर्टचे हात तिने कोपरापर्यंत दुमडले आहेत. तिने फारसा मेकअप केला नाहीये. मोकळ्या सोडलेल्या केसांमध्ये ती खूप सुंदर दिसते आहे. कॅज्युअल असले तरी तिचे हे रूप खूप सोज्वळ दिसत आहे.

चाहत्यांनी अर्थातच नेहमीप्रमाणे तिच्या या पोस्ट वर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. ‘येणाऱ्या प्रत्येक दिवसाला तुमच्या आयुष्यातील सर्वांत सुंदर दिवस बनण्याची संधी द्या’ असे सुंदर कॅप्शन देखील तिने आपल्या या फोटोला दिले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 𝐓𝐞𝐣𝐚𝐬𝐡𝐫𝐢 𝐏𝐫𝐚𝐝𝐡𝐚𝐧 (@tejashripradhan)

चाहत्यांना फोटो आणि कॅप्शन असे दोन्ही जाम आवडून गेले आहेत. तेजश्रीच्या चाहत्यांना तसे तर तेजश्रीचे सगळेच फोटो आवडतात. पण या फोटोमध्ये काहीतरी खास जादू आहे असे दिसते. ‘तू दिवसेंदिवस खूप सुंदर होत चालली आहेस’, ‘क्यूटनेसचे दुकान’, ‘गॉर्जस’, ‘सुंदर’, ‘लव्हली’ अशा कमेंट्स नी तिची पोस्ट सजली आहे.

तेजश्रीची अलीकडेच येऊन गेलेली ‘अगंबाई सासूबाई’ मालिका देखील लोकांनी डोक्यावर घेतली होती. यातील तिचे शुभ्राचे पात्र लोकांना आवडून गेले होते. हे पात्र अत्यंत समंजस, विचारी आणि प्रॅक्टिकल होते. ही भूमिकाही तेजश्रीने तितक्याच सुंदर पद्धतीने साकारली होती.

You might also like