एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

शिक्षक दिन! बॉलिवूड मधील या निर्मात्यांनी दिली होती चित्रपटातून गुरुदक्षिणा! आजही ही गाणी प्रेक्षक ऐकतात आवडीने..

आपल्या आयुष्याला वळण देणारे असतात ते खरे म्हणजे शिक्षकच ज्यांच्यामुळे आपल्याला समाजात वावरायची पद्धत, बोलायची पद्धत अवगत होते. पण समजा शिक्षक नसते तर खूप काही बदल घडला असता. इन्स्टाग्रामवरील सुप्रसिद्ध ग्राफिक्स डिझायनर वैभव शेटकर यांनी सकाळी शिक्षक या शब्दाचे विश्लेषण केलं. त्यांनी त्यांच्या ग्राफिक्स माध्यमातून शि’क्ष’क, यातील क्ष काढून टाकला तर आधी ‘शिक’ मग दुसर्यांना शिकवून तू ही शिक्षक बन! म्हणजे समजात ज्ञान विज्ञान याची देवाणघेवाण जास्त होईल. आणि सगळेच प्रगल्भ होतील.

आज आम्ही शिक्षकांना नमन करून त्यांच्यावर चित्रित झालेली बॉलिवूड मधील काही चित्रपटातील गीते सांगणार आहोत, हे आजही तुम्ही प्रसार माध्यमातून ऐकत असता. बॉलिवूड मधील खूप साऱ्या निर्माते आणि डायरेक्टर या लोकांनी आपल्या जीवनातील शिक्षकाना बॉलिवूड मधील चित्रपटाच्या गाण्यातून दक्षिणा रुपी ही भेट समर्पित केली आहे जे आजही लोकांना आठवते.

रुक जाना नहीं तू कही हार के
१९७४ मधील सुप्रसिद्ध चित्रपट ‘इम्तिहान’ यातील ‘‘रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटो पे चलके मिलेंगे साये बहार के’ हे गाणे आजही खूप लोकप्रिय आहे. या चित्रपटात विनोद खन्ना यांनी शिक्षकाची भूमिका साकारली होती. हे गाणे मारहुज सुलतान पुरी यांनी लिहिले होते. आजही, जेव्हा कोणी हार मानतो, तो हे गाणे ऐकून स्वतःला प्रेरित करूतो असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.

बम बम बोले
‘तारे जमीन पर’, या चित्रपटातील सर्वच गाणी प्रेरणादायी आहेत. अमीर खानच्या या चित्रपटातील एक गाणे खूपच मजेशीर आहे ज्यात आमिर आपल्या शिष्यांसोबत वर्गात मजा करताना दिसत आहे. हे गाणे प्रसून जोशी यांनी लिहले आहे, शान आणि अमीर खान यांनी या गाण्याला आपला आवाज दिला आहे. हे गाणे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे.

खोल दे पर
राणी मुखर्जी यांचा ‘हिचकी’ चित्रपटातील ‘खोल दे पर’ हे गाणेही गुरुशिष्यावर आधारित आहे. हे गाणे राज शेखर यांनी लिहिले होते आणि याला सुप्रसिद्ध गायक अरजीत सिंग यांनी गायले होते. हे गाणे आजही विशेष प्रसिद्ध आहे.

You might also like