एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘तारक मेहता का…’ मधील बबिता आणि टप्पू रिले’श’नशिप मध्ये? बऱ्याच काळापासून आहे या गोष्टीची चर्चा…

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका गेली तेरा वर्षे अतिशय यशस्वीपणे चालू आहे. या मालिकेचा चाहतावर्ग अजूनही नेमाने ही मालिका बघतो. मालिकेतील व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आता जणू घरच्याच असल्यासारख्या वाटतात. मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या मनाच्या खूप जवळचा आहे. या मालिकेतील ठराविक कलाकार बदलले असले तरी काळाबरोबर त्यांनीही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेत बाजी मारली आहे.

अलीकडेच यातील दोन कलाकार एकमेकांना डे’ट करत असल्याची बातमी समोर आली आहे. हे दोन कलाकार कोण आहेत, हे ऐकून तुम्हाला खरंच खूप आश्चर्य वाटेल. हे कलाकार आहेत बबिता आणि टप्पू. होय, हे दोघे अनेक दिवसांपासून एकमेकांना डे’ट करत असल्याच्या चर्चा आहेत.

मालिकेत जेठालाल नेहमीच बबिताच्या मागे मागे करताना दाखवला आहे. बबिता केवळ दिसली तरी जेठालाल खूष होऊन जातो. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र जेठालालच्या मुलानेच बाजी मारल्याचे दिसून येत आहे.

बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता आणि टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकत प्रत्यक्ष आयुष्यात एकमेकांना खूप पसंत करतात. मुनमुन राजपेक्षा ९ वर्षांनी मोठी आहे. तरीही दोघेही आपल्या नात्याचा आदर करतात.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ च्या सेटवरील प्रत्येकाला या गोष्टीची कल्पना आहे. एवढेच नाही, तर दोघांच्या घरच्यांनाही या गोष्टीबद्दल माहीत आहे. प्रत्यक्षात मात्र कोणीच या दोघांच्या नात्याबद्दल उघडपणे काही बोलत नाही.

दोघांची प्रेमकहाणी बरीच जुनी असली तरी याबाबत बाहेर फार कमी जणांना माहिती आहे. राज ज्या पद्धतीने मुनमुनच्या पोस्ट्स वर कमेंट्स करतो, त्यावरून या दोघांमध्ये मैत्रीपेक्षाही काहीतरी जास्त आहे, हे कळून येते. याबाबत मुनमुन किंवा राज यांच्याकडून कोणतेच अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. प्रेक्षक मात्र या बातमीने खूष झाले आहेत.

मालिका सुरू झाल्यापासून मुनमुन या मालिकेचा भाग आहे. मधला काही काळ मुनमुन मालिकेतून बाहेर होती. प्रेक्षकांना वाटले की तिने मालिका सोडली आहे. खरंतर तिच्या एका व्हिडिओ वरून ती मध्ये वा’दात अडकली होती, त्यामुळेच तिला मालिकेत पाहता आले नव्हते. आता मात्र ती परत आली आहे त्यामुळे प्रेक्षक खूप खूष आहेत. २०१७ मध्ये भव्य गांधी ने ही मालिका सोडल्यानंतर राज अनादकत ने टप्पूची भूमिका करायला सुरुवात केली.

You might also like