एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘तारक मेहता का…’ मालिकेत ‘ती’ परत आलीये! अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली…

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका सगळ्यांचीच आवडती आहे. सहकुटुंब सहपरिवार बघावी अशी ही मालिका आहे. त्यामुळे घरातल्या सगळ्यांनाच या मालिकेतील व्यक्तिरेखा माहीत आहेत. तसेच यातील कलाकार देखील सगळ्यांच्या परिचयाचे झाले आहेत. अगदी छोटी भूमिका असली तरी लोकांच्या ती लक्षात राहते. अशीच एक व्यक्तिरेखा आहे रिटा रिपोर्टर ची. गोकुळधाम सोसायटीत घडणारी प्रत्येक गोष्ट जगापर्यंत पोचवण्याचं काम ही रिटा रिपोर्टर करत असते.

मध्यंतरी रिटा रिपोर्टर ला प्रेक्षकांनी बऱ्याच भागांमध्ये पाहिले नव्हते. त्यामुळे रिटा गेली कुठे, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. रिटा ची भूमिका प्रिया अहुजा या अभिनेत्रीने साकारली आहे. रिटाने मालिकेचा दिग्दर्शक मालव राजदा सोबत लग्नगाठ बांधली आहे.

आपल्या गरोदरपणामुळे प्रिया मालिकेपासून लांब होती. आता मात्र बाळंतपणानंतर ती परत मालिकेत आली आहे. प्रेक्षकांना अर्थातच आपल्या लाडक्या रिटा रिपोर्टर ला पाहून खूप आनंद झाला आहे.

प्रिया सोशल मीडिया वर खूप सक्रीय असते. मालिकेच्या सेट वरचे फोटो आणि व्हिडिओ तर ती शेअर करत असतेच. पण खूपदा ती आपल्या वैयक्तिक आयुष्यातीलही काही घडामोडी सोशल मीडिया वर शेअर करताना दिसते. त्यामुळे प्रेक्षकांना कलाकारांच्या खासगी आयष्याबद्दल जाणून घ्यायची संधी मिळते. मालिकेतील बाकी कलाकारही सोशल मीडिया वर सक्रीय आहेत. तेही सेटवरची धमाल मस्ती सोशल मीडिया वर शेअर करत असतात.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Malav Rajda (@malavrajda)

दयाबेन कधी परत येणार?
रिटा रिपोर्टर जरी परत मालिकेत आली असली तरी प्रेक्षकांना आता प्रतीक्षा आहे सगळ्यांची लाडकी दयाबेन ची. गेल्या काही भागांपासून प्रेक्षकांची लाडकी व्यक्तिरेखा दया जेठालाल गडा मालिकेत दिसली नाहीये. त्यामुळे प्रेक्षकांनी तिला मिस करायला सुरुवात केली आहे. आता तर रिटा रिपोर्टर पण आली, पण दयाबेन कधी येणार? असा प्रश्न समस्त प्रेक्षकवर्गाला पडला आहे.

रिटा रिपोर्टर परत आल्याने प्रेक्षकांच्या आशा उंचावल्या आहेत. लवकरच दयाबेन देखील मालिकेत परत येईल अशी आशा त्यांना आहे. मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये कळेलच की दयाबेन नक्की कधी परत येणार आहे.

मित्रांनो, तुमच्या आवडत्या कलाकारांबद्दल अशाच बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यासाठी आमचे लेख नियमितपणे वाचत चला. तसेच तुम्हाला आवडलेले लेख लाईक करा. त्याचबरोबर तुमचे आवडते लेख आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करायला विसरू नका.

You might also like