एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘…तर तीन वर्षं तुरुंगात मुक्काम नक्की!’ राज कुंद्रा अ’टक प्रकरणात कायदेतज्ज्ञांचे मत…

अ’श्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला १९ जुलै २०२१ रोजी अटक करण्यात आली. २३ जुलै पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मंगळवारी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने त्याला भायखळा पोलीस स्टेशनला चौकशीसाठी हलवले. यावेळी राज कुंद्रा अत्यंत निराश अवस्थेत आढळून आला. पोलिसांच्या हाती यावेळी या प्रकरणात राज कुंद्राच्या विरोधात भक्कम पुरावे हाती लागल्याचे कळते.

राज कुंद्रावर अनेक आयपीसी कलमांतर्गत गु’न्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आयटी ऍक्ट कलम ६७ आणि ६७A देखील लावण्यात आले आहे. यापैकी ६७A हे कलमी पो’र्नोग्राफी संदर्भातील आहे. या कलमांतर्गत दाखल केलेला गुन्हा हा अजामीनपात्र गुन्हा आहे. यामध्ये पहिल्यांदा गुन्हा केल्यास ३ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आणि ५ लाख रुपये दंड आकारला जातो.

एकाच व्यक्तीने दुसऱ्यांदा तोच गुन्हा केल्यास त्याला ५ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा आणि १० लाख रुपये दंड आकारला जातो. हाच गुन्हा तिसऱ्यांदा घडल्यास ७ वर्षे तुरुंगवास आणि १० लाख रुपये दंडाची रक्कम आकारली जाते, अशी माहिती कायदे विशेषज्ञ आणि सायबर एक्सपर्ट प्रशांत माळी यांनी सांगितली.

राज कुंद्रा बद्दल सध्या फक्त चौकशी सुरू आहे. मात्र त्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला किमान ३ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा भोगण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे. राज कुंद्राला गेल्या वर्षी या प्रकरणात कोर्टाकडून अंतरिम जामीन मिळाला होता आणि या महिन्याच्या अखेरीस त्या जामीन अर्जावर अंतिम सुनावणी होती.

या प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांची नावेदेखील आरो’पी म्हणून समोर आली आहेत. महाराष्ट्र सायबरच्या सूत्रांनी ही माहिती दिली असून त्यांनी या दोघींचा जबाब नोंदवून घेतला आहे. या दोघीनींही राज कुंद्रावर आरो’प केले होते.

या सगळ्यानंतर यूट्युबर पुनीत कौरने देखील आता राज कुंद्रावर निशाणा साधला आहे. राज कुंद्राने तिला त्याच्या मोबाईल ऍप हॉटशॉट्सशी कनेक्ट करण्यासाठी थेट संदेश पाठवला होता, असा धक्कादायक खुलासा वजा आरोप तिने केला आहे. तिला आधी हा स्पॅम मेसेज वाटला.

पुनीतने आपल्या एका इन्स्टा स्टोरीवर एका मित्राला टॅग करत “ब्रो, तुला आठवतो का आपला डायरेक्ट मेसेज, जेथे त्याने मला हॉटशॉट्स साठी मेसेज केला होता?” अशी कॅप्शन टाकली आहे. या प्रकरणाच्या अंतिम निकालानंतरच सगळ्या आ’रोपांवर पडदा पडेल असे दिसते.

You might also like